12 Jul. 2017
अक्षय कुमारच्या ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ या आगामी चित्रपटाचे ‘गोरी तू लट्ठ मार’ हे गाणे आज रिलीज झाले. या गाण्यात अक्षय कुमार व भूमी पेडणेकर होळीचे रंग उधळतांना दिसत आहेत.
अक्षय कुमारच्या ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ या आगामी चित्रपटाचे ‘गोरी तू लट्ठ मार’ हे गाणे आज रिलीज झाले. या गाण्यात अक्षय कुमार व भूमी पेडणेकर होळीचे रंग उधळतांना दिसत आहेत. गाण्यात अक्षय म्हणजेच केशव भूमीसोबत अर्थात पत्नी जयासोबत होळी खेळायला गावात जातो आणि यादरम्यान तिची माफी मागताना दिसतोय. सोनू निगम आणि पलक मुछाल यांच्या आवाजातील या गाण्याला संगीत दिले आहे, मानस व शिखर यांनी. गाण्याची सुरूवात फोनवरच्या एका संवादाने होते. जया केशवला फोनवर यापुढे मला कधीही फोन करू नकोस, असे सांगते. यानंतर जयासोबत बोलायला गावात पोहोचतो.
या चित्रपटाचे ‘हस मत पगली’ हे गाणे तुफान लोकप्रीय झाले आहे. या गाण्याचे मेल आणि फिमेल असे दोन्ही व्हर्जन आपण ऐकलेत. याशिवाय या गाण्याचे ड्यूएट व्हर्जनही रिलीज केले गेलेय. याशिवाय ‘बखेडा’ हे गाणेही गत आठवड्यात रिलीज झाले. अरूण भाटिया निर्मित या चित्रपटात अक्षय व भूमी मुख्य भूमिकेत आहेत. केशव आणि जया नामक व्यक्तिरेखा ते साकारताना दिसणार आहे. केशव व जया दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात. दोघांचेही लग्न होते. पण घरात शौचालय नसल्याच्या कारणाने जया घर सोडून निघून जाते. आता हा ‘बखेडा’ कसा सुटतो, हे मात्र तुम्हाला चित्रपट रिलीज झाल्यानंतरच कळणार आहे. येत्या आॅगस्ट महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.










