👁 11 Views

गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायात वाढ करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईदि. 20 : राज्यात खाऱ्या पाण्यातील मत्स्यव्यवसायाबरोबरच गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यासाठी प्रयत्न करावेतअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.
            पशुसंवर्धनदुग्धविकास आणि मत्स्य विकास विभागाची आढावा बैठक मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस पशुसंवर्धनदुग्धविकास आणि मत्स्य विकास मंत्री महादेव जानकरमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशीपदुम विभागाचे सचिव विकास देशमुखपशुसंवर्धन आयुक्त कांतीलाल उमापमत्स्य व्यवसाय आयुक्त अरुण शिंदेदुग्धविकास आयुक्त आर. आर. जाधव उपस्थित होते.
            मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी बैठकीदरम्यान विविध सूचना दिल्या. ते म्हणाले,राज्यात मत्स्ययुक्त तलाव योजना कार्यान्वित करावी. राज्यात 114 कोटी मत्स्य बिजाची आवश्यकता असताना प्रत्यक्षात कमी प्रमाणात मत्स्यबीज उत्पादन होत असल्याने उर्वरित मत्स्यबीज इतर राज्यातून आयात करावे लागते. मत्स्यबीज उत्पादनात राज्याला स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. राज्यातील पशुसंवर्धन विभागाच्या फार्मस् वरील अतिक्रमणांचे अचूक मोजमाप करण्यासाठी ड्रोणद्वारे सर्वेक्षण करावेअशा सूचना त्यांनी दिल्या.
तलाव तेथे मासोळी योजनेसाठी डीपीसीमध्ये तरतूद करा
तलाव तेथे मासोळी योजना राज्यभरात जिल्हा पातळीवर राबविण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीमध्ये (डीपीसी) तरतूद करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात,असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
            पशुसंवर्धनदुग्धविकास आणि मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर यांनी राज्यात तामिळनाडूच्या धर्तीवर मत्स्य व्यवसाय विकासासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगितले. पारंपरिक मासेमारांचे हित जोपासण्यास प्राधान्य दिले जात आहे. त्याबरोबरच पर्ससिन जाळ्याद्वारे मासेमारीसाठी योग्य धोरण राबविण्यासाठी विभागामार्फत प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले.
            बैठकीमध्ये पदुम विभागाचे सचिव श्री. देशमुख यांनी विभागाबाबत सादरीकरण केले. राज्यातील मत्स्योत्पादन 2 लाख मे. टनापर्यंत पोहोचले आहेअशी माहिती त्यांनी दिली. मिशन बोटुकलीगोड्या पाण्याबरोबरच खुल्या समुद्रातील पिंजरा पद्धतीने मत्स्यसंवर्धन प्रकल्पसागरी मासेमारी नियमन करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनापारंपरिक मासेमारांच्या हितसंवर्धनासाठी करावयाच्या उपाययोजनापशुसंवर्धन विभागांतर्गत तालुका तेथे पशुधनाच्या उपचारांसाठी मिनी पॉली क्लिनीक स्थापन्याची गरजविदर्भ मराठवाडा दुग्धविकास आराखडा आदींबाबत सादरीकरणात माहिती दिली.
            तिन्ही विभागातील रिक्त पदे भरण्याची गरज सचिव विकास देशमुख यांनी व्यक्त केली असता मुख्यमंत्री श्री. देशमुख यांनी त्यास सहमती दर्शविली.

            बैठकीस तीनही विभागातील उपसचिवसह आयुक्तपशुधन विकास अधिकारी,उपायुक्त आदी अधिकारी उपस्थित होते.

जाहिरात 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




  






























Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *