👁 11 Views

मतदार नोंदणी सारख्या सामाजिक जबाबदारीत स्वेरीचे योगदान महत्वपूर्ण – तहसीलदार मधुसूदन बर्गे स्वेरीत मतदार नाव नोंदणीच्या फॉर्म ६ चे वाटप

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. ! 

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live 

मतदार नोंदणी सारख्या सामाजिक जबाबदारीत स्वेरीचे योगदान महत्वपूर्ण – तहसीलदार मधुसूदन बर्गे

स्वेरीत मतदार नाव नोंदणीच्या फॉर्म ६ चे वाटप
स्वेरीतील विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्व व स्पर्धा परीक्षेविषयी मार्गदर्शन करताना पंढरपुरचे तहसीलदार मधुसूदन बर्गे सोबत डावीकडून मंडल अधिकारी दिनेश भडंगे, स्वेरीचे सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे गोपाळपूरचे तलाठी के.एच.गायकवाड, चळ्याचे तलाठी ए. बी. काळेल, आदी .
पंढरपूर- ‘शैक्षणिक क्षेत्रात पंढरपुरच्या स्वेरी तथा श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूटचे नाव आता सर्वदूर पसरले आहे हे स्वेरीने केवळ शैक्षणिक क्षेत्रातच क्रांती केली नसून आता त्यांचे सामाजिक कार्यात देखील मोठे योगदान लाभत आहे आणि हे योगदान प्रशासकीय कार्य क्षेत्रात देखील उल्लेखनीय ठरत आहे.वारी काळात निर्मल वारी अभियान, पोलीस मित्र बनून वारकऱ्यांना मदत, दर्शन रांगेतील तहानलेल्या वारकऱ्यांना पाणी वाटप असो, रक्तदान असो अथवा, तसेच ग्राम स्वच्छता अभियान असो. प्रत्येक सामाजिक सेवेत स्वेरीचा समावेश असतो त्याप्रमाणे मतदार नोंदणी सारख्या सामाजिक जबाबदारीत देखील  स्वेरीचे योगदान महत्वपूर्ण लाभत आहे. ’ असे प्रतिपादन पंढरपुरचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी व्यक्त केले.

               तहसील कार्यालय, पंढरपूर व राष्ट्रीय सेवा योजना सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने  श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट च्या वातानुकुलीत आंतरराष्ट्रीय सेमिनार हॉलमध्ये आयोजिलेल्या कार्यक्रमात ते आणि पंढरपूर तालुका स्तरीय प्रशासकीय यंत्रणा मतदान प्रक्रियेत १८ वर्षे पूर्ण झालेल्या मतदारांना मतदानाचे महत्व व मतदार यादीत नाव नोंद करण्याविषयी आवाहन करण्याकरीता आले होते. यावेळी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. व्यासपीठावर त्यांच्या समवेत मंडल अधिकारी दिनेश भडंगे, गोपाळपूरचे तलाठी के.एच.गायकवाड, चळ्याचे तलाठी ए. बी. काळेल यांच्यासह स्वेरी अंतर्गत असणाऱ्या इतर तीनही महाविद्यालयाचे प्राचार्य, अभियांत्रिकी पदवीचे उपप्राचार्य प्रा. एन.डी.मिसाळ, विद्यार्थी अधिष्ठाता प्रा. सचिन गवळी, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. ए.जी. कोरके, प्राध्यापक वर्ग व अभियांत्रिकी व फार्मसीचे विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. 

प्रारंभी सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे स्वागत करून मतदानाचे महत्व व मतदार यादीत नावे नोंद करण्याविषयी आवाहन केले. पुढे बोलताना तहसीलदार बर्गे म्हणाले की, ‘स्वेरीकडून मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर प्रत्येक कार्यक्रम पुढे यशस्वी होतो असे समीकरण झाले आहे. त्यामुळे प्रत्येकजण स्वेरी पासून आपल्या कार्याची सुरवात करण्याकडे लक्ष देत असतात. मी जेव्हा स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालो. पुढे पुन्हा नव्याने अभ्यास करावा लागला म्हणून याच वयात जास्त परिश्रम घेतल्यास भविष्य उज्वल आहे. भविष्यात करिअर करताना न्यूनगंड झटकून उच्च विचार करणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही भारताचे ब्रँड अँबेसिडर आहात त्यामुळे आपण देखील आपल्या पवित्र मतदान करण्यापासून वंचित राहू नका. यासाठी ज्या विद्यार्थ्यांची वयाची १८ वर्षे पूर्ण झाली आहेत अशांनी ‘फॉर्म ६’ भरून शासनाकडे सादर करणे गरजेचे आहे.’ असे सांगून तहसीलदारांनी विद्यार्थ्यांना ‘स्पर्धा परीक्षा’चे मार्गदर्शन करून‘मतदान नाव नोदणी’ या राष्ट्रीय कार्यासाठी प्रेरीत केले. मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात काही विद्यार्थ्यांना फॉर्म ६ चे वाटप केले तर उर्वरीत फॉर्म सचिव व  प्राचार्य डॉ. रोंगे यांच्याकडे सुपूर्द केले. प्रा. यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.   

जाहिरात 



पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111





  













Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *