👁 9 Views

मोहोळ तालुक्यातून 42 लाखाचे चंदन जप्त…! आरोपी जेरबंद! सोलापूर जिल्ह्यातील चंदनतस्करांवर पोलिसांची करडी नजर!!

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. ! 

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live 

पंढरपूर Live 29 July 2017


 मोहोळ तालुक्यातून 42 लाखाचे चंदन जप्त…! आरोपी जेरबंद! सोलापूर जिल्ह्यातील चंदनतस्करांवर पोलिसांची करडी नजर!!

मोहोळ दि २९ : मोहोळ तालुक्यातील वाफळे गावात पोलीस अधीक्षक ग्रामीण यांच्या विशेष पथकाने छापा टाकून ४२ लाख १० हजार रुपयांचे १५०० किलो चंदन जप्त केल्याची घटना घडली. नुकतीच पंढरपूर तालुक्यातील चंदनतस्करावरची कारवाई व यानंतर मोहोळ तालुक्यातील चंदनचोरीचा पर्दापाश!! यावरून सोलापूर जिल्ह्यात चंदनतस्करी मोठ्या प्रमाणात होतेय आणि यावर आता पोलिसांची करडी नजर आहे, हे सिध्द होतेय.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्याकडे आलेल्या तक्रारीवरून वाफळे गावाच्या शिवारात राहणा-या श्रीकृष्ण उर्फ बिनू बळीराम दाढे हा त्याच्या शेतातील राहत्या घरी व घराच्या पाठीमागील बाजूस चोरीच्या चंदनाची तोडलेली लाकडे याचा एकत्रित साठा करून परजिल्ह्यात विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती़ त्यावरून विशेष पथकातील परीवेक्षाधिन संदीप मेटके, सपोनि संदीप धांडे, सपोनि गणेश निंबाळकर, पोहेकॉ मनोहर माने, पोलीस नाईक अमृत खेडकर, पोलीस कॉ़ प्रवीण पाटील, अमोल जाधव, दिनेश राठोड, अमोल माने, बाळराजे घाडगे, सुरेश लामजने, पांडुरंग केंद्रे, महादेव लोंढे, बालाजी नागरगोजे, सोमनाथ बोराटे, विलास पारधी, अक्षय दळवी, सिद्धाराम स्वामी आदींच्या पथकाने २८ जुलै रोजी सकाळी १० वा़च्या दरम्यान छापा टाकला असता बिनू दाढे याने पांढºया रंगाच्या गोण्यात घरातील एका खोलीमध्ये व घराच्या पाठीमागील बाजूस सुगंधित चंदनाची लाकडे ठेवली असल्याचे आढळून आले़ चंदनाच्या गोण्याचे वजन केले असता १५८० किलो इतके वजन भरले़ त्याची किंमत ४२ लाख १० हजार रुपये इतकी असल्याचे सपोनि संदीप धांडे यांनी सांगितले.


या प्रकरणी दाढे याच्यावर मोहोळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यास मोहोळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111












  





Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *