👁 6 Views

जोतिबाच्या नावानं चांगभलं!! च्या गजरात श्रावण षष्ठीची सांगता…

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. ! 

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live 

पंढरपूर Live 29 July 2017

जोतिबाच्या नावानं चांगभलं!! च्या गजरात श्रावण षष्ठीची सांगता…


कोल्हापूर, दि. 29 – श्री जोतिबा देवाची शुक्रवारी श्रावण षष्ठी यात्रा भरली व शनिवारी चांगभलंच्या गजरात श्रावण षष्ठीची सांगता झाली आहे. श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी व जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथील जोतिबा मंदिरातील चोपडाईदेवीची श्रावण षष्ठी यात्रेसाठी लाखो भाविक दाखल झाले होते. चैत्र यात्रेनंतर भरणारी ही दुसरी मोठी यात्रा असते. दोन ते अडीच लाख भाविक मुंबई, सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर भागातून येथे येतात.

जोतिबा डोंगरावर दरवर्षी श्रावण महिन्यात भरणारी श्रावण षष्ठी यात्रा ही श्री चोपडाई देवीसाठी भरवली जाते. भाविक चोपडाई देवीला साडीचोळी अर्पण करतात. शुक्रवारी धुपारती करण्यात आली.


तर रात्रभर मंदिरात धार्मिक विधि सुरू होत्या. श्री चोपडाई देवीची लिंबू, बेलपत्र, पाना-फुलांची आकर्षक महापूजा बांधली जाते. रात्रभर भाविक जोतिबाच्या डोंगरावर येत असतात. स्थानिक पुजार्‍यांच्या घरी मुक्काम करतात. सर्व भाविक षष्ठीचा उपवास करतात.

दोन दिवस सुरू असलेल्या या यात्रेची सांगता शनिवारी सकाळी सात वाजता धुपारतीनं, चांगभलंच्या गजरात व जल्लोषात करण्यात आली.






पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111












  





Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *