पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
पंढरपूर Live 29 July 2017
श्रीगोंद्यातील पेडगावात दरोडेखोरांच्या मारहाणीत महिला ठार
अहमदनगर, 28 जुलै : श्रीगोंदा तालुक्यातील पेडगावात चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत एक वृद्ध महिला ठार झालीय. सुशीला जगन्नाथ धगाटे असं मरण पावलेल्या महिलेचं नावं आहे. या महिलेने चोरट्यांना विरोध केल्यानं चोरट्यांनी तिला बेदम मारहाण केलीय. त्यात सुशीला धगाटे जागीच ठार झाल्यात. यावेळी चोरट्यांनी घरातला ऐवजही लंपास केलाय. या घटनेनंतर चोरट्यांनी बाजूच्या कार्यकारी सेवा सोसायटीतही चोरीचा प्रयत्न केला. दरम्यान, चोरांचा शोध घेण्यासाठी श्रीगोंदा पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केलंय. दरोड्यात महिलेचा मृत्यू झाल्याने श्रीगोंदा परिसरात प्रचंड खळबळ माजलीय. लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111











