👁 6 Views

हतबलता इथली संपता संपेना…! पित्यापाठोपाठ शेतकरी मुलानेही संपवले जीवन…

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. ! 

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live 

पंढरपूर Live 29 July 2017


हतबलता इथली संपता संपेना…! पित्यापाठोपाठ शेतकरी मुलानेही संपवले जीवन…

बीड – कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. या घटनेला चार महिनेही उलटत नाही तोच मुलानेही आपली जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी केज तालुक्‍यातील साळेगाव येथे घडली आहे.

अधिक माहिती अशी की, शिवाजी छत्रभूज वरपे (वय 32, रा. साळेगाव) असे त्या मुलाचे नाव आहे. अल्पभूधारक वरपे कुटुंबातील छत्रभूज वरपे यांनी 7 मार्च रोजी कर्जबाजारीपणाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. या दु:खातून वरपे कुटुंबीय सावरलेही नव्हते. शुक्रवारी शिवाजी वरपे यानेही टोकाचे पाऊल उचलले. राहत्या घरीच त्यानेही दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. त्यामुळे वरपे कुटुंबीय उघड्यावर आले आहे.




पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111












  





Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *