पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. ! सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
पंढरपूर Live 31 July 2017
ना फणकार तुझसा तेरे बाद आया। मोहम्मद रफी तू बहोत याद आया।
मोहम्मद रफींच्या पुण्यतिथी निमित्त काही आठवणी
आपल्या गाण्यांनी साऱ्या देशाला वेड लावणाऱ्या रफीसाहेबांची आज पुण्यतिथी. 36 वर्षाच्या आपल्या करिअरमध्ये रफी साहेबांनी 6 फिल्मफेअर, एक राष्ट्रीय पुरस्कार आणि पद्मश्री असे मानाचे पुरस्कार मिळवले. 31 जुलै 1980 साली या संगीतातील ताऱ्याने अखेरचा श्वास घेतला. गायक म्हणून रफी साहेब कसे होते हे आपण सगळ्यांनाच माहिती आहे. पण गायकापलीकडचे रफी साहेब माणूस म्हणून कसे होते?
रफींच्या आयुष्यातल्या 10 महत्त्वाच्या घटना
1. रफी साहेबांचा जन्म 1924 साली कोटला सिंग सुलतान या पंजाबातल्या छोट्याशा गावी झाला होता. 1932 साली त्यांच्या कुटूंबाने लाहोरला स्थलांतर केले.
2. आपल्या होणाऱ्या जावयाच्या मदतीने रफी साहेब मुंबईस आले. काही काळ स्ट्रगल केल्यानंतर रफी साहेबांनी आपलं पहिलं गाणं श्याम सुंदरच्या गाव की गोरी या चित्रपटासाठी गायलं.
3. लोकांना रफी साहेबांचा आवाज शम्मी कपूरच्या आवाजाला सूट होतो असं वाटायचं. पण रफी साहेबांचा आवडता हिरो शम्मी कपूर नाही तर राजेंद्र कुमार होता.
4. जेव्हा भारताची फाळणी झाली तेव्हा रफी साहेबांच्या पहिल्या पत्नीने पाकिस्तानला जायचा निर्णय घेतला. पण आपल्या संगीताच्या प्रेमाखातर रफी साहेबांनी भारतातच राहायचा निर्णय घेतला. त्यानंतर आपल्या पहिल्या पत्नीपासून रफीसाहेब वेगळे झाले आणि त्यांची पहिली पत्नी पाकिस्तानात निघून गेली.
5.एकदा संजय गांधी किशोर कुमारांवर प्रचंड नाराज झाले होते. तेव्हा त्यांना मनवण्यासाठी आणि किशोर कुमारांना त्यांच्या रागापासून वाचवण्यासाठी रफी साहेब स्वत:हून संजय गांधींना भेटले.
6.31 जुलैला रफी साहेबांनी या जगाचा निरोप घेतला.मृत्यूनंतर किशोर कुमार रफी साहेबांच्या पायाशी बसून दोन तास ढसाढसा रडत होते.
7. रफी साहेब स्वभावानेही पार दयाळू होते. एकदा पैसे नसल्यामुळे आपल्या कॉलनीत राहणाऱ्या एका विधवेला त्यांनी संघर्ष करताना पाहिलं. त्यानंतर दरमहा अज्ञात व्यक्तीच्या नावाने ते तिला पोस्टाने पैसे पाठवत होते.
8. रफी साहेबांचं संगीतावर प्रचंड प्रेम होतं आणि गाण्याला ते कधीही पैशात तोलत नसत. जेव्हा लता मंगेशकरसह अनेकांनी त्यांना त्यांचं मानधन वाढवायला सांगितलं तेव्हा ते नाराज झाले आणि लता मंगेशकरसोबत पुन्हा गाणं न गायचा निर्णय त्यांनी घेतला.
9. रफी साहेब त्यांच्या करिअरमध्ये कायम नं 1 होते. मन्ना डे यांनी हे कबूल केलं की रफी साहेब असताना मन्ना डे आणि किशोर कुमार कायम दुसऱ्या नंबरसाठी लढायचे.
10.रफीसाहेबांवर लोकांचं प्रचंड प्रेम होतं. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्ययात्रेत 10,000 लोक सामील झाले आणि त्यांच्या मृत्यूनंतर दोन दिवस राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला होता.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
















