👁 9 Views

..जेव्हा रात्री २ वाजता स्मिता पाटीलने केला होता अमिताभ यांना फोन, दिली होती ‘ती’ भयावह बातमी

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application 

 सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

 ………………………………………………..

पंढरपूर Live 2 August 2017

..जेव्हा रात्री २ वाजता स्मिता पाटीलने केला होता अमिताभ यांना फोन, दिली होती ‘ती’ भयावह बातमी

मुंबई – 26 जुलै 1982 हा तोच दिवस होता जेव्हा महानायक अमिताभ बच्चन यांच्या आयुष्याला मोठा हादरा बसला, ‘कुली’ शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांसोबत एक मोठी दुर्घटना घडली. एका फायटींग सीनमध्ये अभिनेता पुनीत इस्सच्या एका ठोश्यामुळे अमिताभ यांच्या आतड्याला जबर मार बसला होता. त्यावेळी तर अमिताभ यांना त्यांना किती मार लागला आहे याची जाणीव झाली नाही. पण काही वेळाने जेव्हा अमिताभ यांच्या पोटात दुखायला लागले होते आणि दुसऱ्या दिवशी त्यांना हॉस्पीटलमध्ये अॅडमिट करण्यात आले होते.
आज या घटनेला बरोबर ३३ वर्ष पूर्ण झाले आहेत. आजच्याच दिवशी अमिताभ मृत्यूच्या दाढेतून परत घरी आले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अमिताभ यांना त्यांच्या या अपघाताविषयी अगोदरच कोणीतरी कल्पना दिली होती ती व्यक्ती होती अभिनेत्री स्मिता पाटील..
पुढच्या स्लाईडवर वाचा, फोन करुन अमिताभ यांना काय म्हटल्या स्मिता पाटील..

रात्री २ वाजता केला होता स्मिता यांनी फोन..

अमिताभ बच्चन यांनी सांगितले की, कुली चित्रपटाचे शूटिंग बंगळुरुमध्ये सुरु होते. त्यादरम्यान एकदा रात्री २ वाजता मला रिसेप्शनमधून फोन आला. त्यांनी सांगितले की, अभिनेत्री स्मिता पाटील यांना तुमच्याशी बोलायचे आहे. मी चरकलो कारण मी कधीही स्मिताशी इतक्या रात्री बोललो नव्हतो. मी फोन घेतल्यावर मला समोरुन स्मिता यांनी विचारले, तुमची तब्येत ठिक आहे ना? यावर मी हो असे उत्तर दिले. त्याच्या दुसऱ्या दिवशीच माझ्यासोबत अपघात घडला.

अमिताभ बच्चन आणि स्मिता पाटील यांनी ‘नमक हलाल’, ‘शक्ती’ आणि ‘गुलामी’ या सिनेमात काम केले आहे.

पुढच्या स्लाईडवर पाहा, या coolie चित्रपटादरम्यानचे काही खास PHOTOS..

कुलीच्या सेटवर अमिताभ बच्चन आणि पुनीत इस्सर

अपघातातून बचावल्यानंतर घरी आलेले अमिताभ बच्चन

कुली चित्रपटादरम्यान अमिताभ बच्चन

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *