👁 5 Views

‘अ थे ति’ कवितासंग्रहाचं रसग्रहण….

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application 

 सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

 ………………………………………………..

पंढरपूर Live 4 August 2017


अथेति यां स्थितींचा भूलभुलैया
प्रसाद कुमठेकर
कवी महेशलिलापंडित यांचा 1994ला सुरु झालेल्या काव्य प्रवासाचा पहिला थांबा
या काव्यसंग्रहाचा रसग्रहण

मी लहानपणी भीती जावी म्हणून म्हणत असलेल्या रामरक्षेत आलेला अथ, अथ ध्यानम् ।्।
ध्यायेदाजानुबाहुन्, धृतशरधनुषम्, बद्धपद्मासनस्थम् पीतं वासो वसानन्, नवकमलदलस्पर्धिनेत्रम् प्रसन्नम्।
आन बुद्धी यावी म्हणून म्हणत असलेल्या गणपती स्तोत्रात आलेल्या इति, इति
श्रीनारदपुराणे संकटनाशनं नाम श्रीगणपतिस्तोत्रं संपूर्णम ॥ या दोन शब्दाच्या साटेलोट्यानं किंवा
युतीने साकारला गेलेला शब्द अथेती. अथ + इति.

कवितेत जुन्ना चावल’ असलेल्या महेशलिलापंडित यांचा पहिला कवितासंग्रह
पाहिलं अन त्यात पहिल्यांदा नजरेत भरली ती मराठी कवितेच्या पुस्तकात
फारंच कमी वेळा दिसणारी  बरंच काही सांगू पाहणारं ऍबस्ट्रॅक्ट जडशीळ
कव्हर,पुस्तकात दुर्मिळच दिसणारा पिवळा जाड कागद आणि टाइम घेऊन केलेली उत्कृष्ट
बांधणी (बायडिंग). पाहिलं कव्हरला लागून असलेलं काळपान, दुसरं सुंदर आणि नजरेत
भरतील अश्या फॉन्ट मध्ये लिहलेलं  तिसरं पुनः अथेति/कविता त्याखाली
महेशलिलापंडित(असंच बिना ग्यापचं) आणि त्याखाली कंसात महेश सैंदाणे, टिशीवरचं नाव
आणि त्याच्याखाली पार प्रकाशन आणि त्याच्याखाली त्या पाराचं चित्र, लोगो. याच पानाच्या
पाठीवर पाय देऊन येणार्‍या पानावर मग सारे डिटेल्स जसे पहिली आवृत्ती डिसेंबर 2015, पत्ता,
हक्क लेखकाच्या स्वाधीन सांगणारं चिन्ह आणि किंमत 160 रुपये. तुम्ही पुस्तक हातात
घेतल्यावर कदाचित ती जास्त वाटणार नाही. कारण एकंच त्याची र्िींेीं;प्रोडक्शन व्हॅर्लूिींेीं; दर्शनी
आणि वाचून मिळणार्‍या अनुभवातून देखील.
सुख दुःख
आशा निराशा
प्रेमतिरस्कार
यशअपयश
कोतुकउपहास आणि सारंकाही
घेऊन माझ्या आयुष्यात आलेल्या व्यक्तीमुळे

जेकाही रेन्डर झालंय

त्याच्या सर्व शेअर होल्डर्सना समर्पित

समर्पण पत्रिकेमधून डोकावणारे शेअरहोल्डर्स, द रेन्डर्ड असले खतरनाक शब्द आणि त्याच्या
खाली कवितेला कथा म्हणून लिहलेली आणखी एक खतरनाक कविता आणि आखिरला

तुमच्या वाट्याला आलेल्या
कथां साठी
तुम्हीच जवाबदार

अशी वॉर्निंग! येणारं कायतरी वजनीआय, गंभीराय. उगीच लोकांसाठी लोकांकरिता लोकांच्या
संवेदना करत मजेदार टेम्पास म्हणून खरडल्यासारखं आम्ही काही केलं नाही
हे वजनानं सांगणारी. आणि मग नंतरचं पाठमोरं पान 39;मनोगत39;चं. त्यात आपल्याला कवी
उलगडून सांगतो अथ पासून इतिपर्यंत सारं काही माहित व कळत असल्याचं इल्युजन.
णपभान, गदक आणि अथेती स्टेजेसची सतत मरेपर्यंत होणारी आपली स्विचिंग चालणारी
धप्पन धुप्पी. आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि प्रवास भाषावर्तनातून प्रक्षेपित करण्याचा
त्याचा प्रयोग हो वाचताना आपल्याला सतत आपल्या डोक्यावरून सिनेमात उडतात
तशी विमानं((रंग दे बसंतीतल्यासारखी) झुम्मकरून जात असल्याचा आभास होतो. वाचलेलं
काही आपल्यात सांडतं काही मस्तपैकी विमानासारखं आपल्या डोक्याभोवती पिंगा घालतं.
परत एकदा समजतंय ..समजलंय … समजेल बहुदा … नाही थोडं जड नाही थोडं जास्तच
जड आहे पण समजलं तर मजा येईल आशा स्टेजेस मधून अथेती घेऊन जातं आपल्याला
आपलाच सतरंगी उरूस दाखवत.
ज्यात पहिल्यांदा आपल्याला दिसतो रट्टेबाज पठडीत चालणार्‍या शिक्षणाने झालेला, सरांनी
केलेला आपल्यातलाच शंकाकुशंकांनी गाभण झालेला बैल आणि येऊ लागतात
चिरंजीवीभवलेल्या कळा. ज्या मग अथेती वाचून संपल्यानंतरसुद्धा सतत जाणवत राहतात

आणि मग तुम्ही परत एकदा फिरून अथेती हातात घेता. त्यात शेष असलेल्या, सुटलेल्या
कळा अनुभवायला आणि हा अथ ते इतिचा अनसंपेबल लूप राहतो.
र्ीपभान करणार्‍या दहा कविता ज्यात भेटतो ऐन एकोणिशीत तारुण्य मेलेल्या आणि त्याचं
आजपरेंत श्राद्ध घालणारा शेंदूरवासाचा कॉन्सन्ट्रेटेड आत्मा आणि तुम्ही अनुभवू लागता मग
तो नाकातले केस जाळल्यासारखा कवितेचा खऊर वास जो डायरेक्ट तुमच्या डोक्यात जाऊन
गरागर फिरवायला लागतो 360अंशाच्या कोनात दाखवून आणतो ती फेज कवितेतली, जेव्हां
तुमच्या बाथरूममधल्या हेरॉईनच्या फोटो निरर्थक झालेल्या, येडझवी नितीमत्ता, गंडूपणाची
लपाछपी. स्क्लप्चर कवितेला काढण्या, ठेवण्या, लादण्याचा हिसकावण्याच्या खेळाने होणारा
र्िींेीं;मार्झािींेीं; वो ब ड धो ब ड दगड आपल्या.. खुदिच्या लॉजिकने केलेला मिळवलेला… त्यात
अभिप्रेत असलेला नव्हे. आणि मग तीच ती दुःखी दगड कि आत्मकथा. सगळंच अस्वस्थ
र्ीपभान करणारं.
अत्यंत प्रयोगशील, अतिशय वेगळी धाटणी, वास्तवाचं भान असलेली इत्यादी इत्यादी
घासून पुळचट झालेले शब्द आधी पुष्कळांच्या कवितेसाठी वापरले गेले आहेत. पण नियमांच्या
जु’ ने बांधलेल्या कविता कवी महेशलिलापंडित यांनी अक्षरशः कवितेच्या मानेवरचा 39;जू39;
मोडून मुक्त केल्यात. आणि त्यांच्या या कविता आता कानात वारं शिरल्यासारखं वाचकांच्या
डोळ्यातुन त्यांच्या मनात घुसू घुसू ढुश्या देतात आणि आपलं चारचौघांसारखं असलेलं
तृतीय श्रेणी
पगारावलेलं
महिनावलेलं जीवन…
त्यांच्या या ढुसण्यानं आतून बाहेरून हलल्याचा आभास होऊ शकतो. त्यांच्या
कवितेतले शब्द नेहमीच्या शब्दासारखे 2ऊ नाहीत तर त्याला अगणित डायमेन्शन्स/ मिती

आहेत जसे 39;श्रेणी39; या त्याच्या कवितेत वापरले गेलेले रवीईईईवार शनीईईईवार हे शब्द,
विस्तृत समरी आणि विद्यापीठ मधला र्िींेीं;आतला आनंद बुडबुडा प्रतिसार्दिींेीं;. होत नाही धाडस
या कवितेतल्या र्िींेीं;वांगेभरीत डोळ्यांचं, कुल्ले चिम्टावलेले, डोळ्यात त्तोलानिक
थैमान,विरोधाभासाच्या चौथर्‍यावर र्िींेीं; अशे एक नाही कितीतरी शब्द याच्या हर एक कवितेच्या
चप्प्या चप्प्यावर डायनामाईट -लँडमाईनसारखे पेरले गेलेत. फक्त नज़रेचं वजन पडूद्यात
तुम्ही उडालातंच आभाळात बुम.
ओरिजिनल ओफिसला जमा
जगतोय फक्त अट्टेस्टेड लाईफ
डोकं ब्लास्ट जगण्याच्या चिंधड्या चिंधड्या राई राई एवढ्या…
सेयिंगवर चढचढचढून शाऊटिंग
सोडून सगळे इझम्स गेलेत
स्कॉलरशिप दाखवण्यासाठी
ड्रॉयडन पॉप श्याडवेल पेक्षा
आम्ही टोकाला जातो
कधी कधी आपण म्हणतो वेडा कवी हा अक्षरशः येडाय कारण शहाणी कवी माणसं
हाथ राखून लिहतात पण महेशालिलापंडित अक्षरशः नागडे होतात आपल्यासमोर आणि
आपल्याला कवितेत व्यक्त होणारी यांची ती इमेज आरशासारखी दिसते मग इच्छा असो वा
नसो मग तसंच पाहणं आलंच स्वतःकड.
माझ्या आयुष्यात या कविता संग्रहाइतके इतके कॉन्ट्रडीक्ट करणारे टायटल्स मी
कोठेही वाचले नसतील.

कॉन्फिडन्ट हेलकावे
सुलभ लेबर
तरंगती ग्र्यविटी
अनरिअल सत्य
फ्रेंडली शत्रुत्व
वाचताना हसू येतं आणि मग नीट वाचताना काय काय होतं, कसं कसं वाटतं, का का
वाटतं हा मूलभूत क्वेशन मार्क आहे
विचारांचा पंचायती मार
वर्तमानाने सुतला जात
अनपरवडेबल अनविभाजनेबल रॅशनयालीटी
अथेती मध्ये कविताक्रम ज्या पद्धतीने लावलाय त्या पद्धतीनं वाचत गेल्यावर
आपल्याला लक्षात येतं हे एक ट्रेनिंग सेशन सारखाय. महेशालीलापंडित पहिल्यांदा
आपल्याला सांगतात र्ीपभान कसं होतं मग तो आपल्याला गदक स्थितीत आणतात
म्हणजे ज्या स्थितीत आपल्याला आपल्या जगण्यातलं उघडं पितळ कळून आलेलं असतं.
या गदक स्थितीत होतो जगण्याचा पेन इन विचार
समजदार पणा
खूप विचार
भोगतोय
अश्वत्थामाच्या जखमेसारखा

ना दिन को सुकू है शाकीर
आणि नंतरच्या कुठल्यातरी नंबरच्या ओळीत येणारं
फक्त जखमेभोवती
जग फिरवणं
समजदारीचा टेम्भा
मिरवणं

जर कुणाला अथेतीमध्ये व्याकरणात चुका दिसल्या, जर का शब्दांच्या मांडणीत चुका दिसल्या,
जर का एकाच शब्द तिसरी दुसरीकडं लिहलाय असे दिसले (आणि ते दिसतातंच.) तर कवींच्या
विद्वत्तेवर शंका नं घेता त्यांनी असं का केलं असेल असं एकदा स्वतःला विचारावं अन त्या
चुका आहेत तश्या वाचाव्यात लक्ष्यात येईल हा प्रयोग आहे जो आपल्याला एका टोकाच्या
अनुभव विश्वात नेतो. शब्दमांडणीतून निर्माण केलेली हि अशी अनुभूती अद्यापि तरी माझ्या
वाचनात आली नाही. एकंदरीत कविता संग्रह वाचताना तुम्हाला गुदगुल्या होतात,टाचण्या
टोचतात, चिमटे काढले जातात, मग तुम्हाला मोठ्या धबधब्यासारखं गडगडाटी हसू येतं मधेच
तुमचं नाक चिमटीत धरून तोंड दाबल्यासारखं वाटतं, पोळतं, थंडगार वाटतं, सबकुछ शून्य झूठ
मिथ्या वाटतं, शिट्ट्या मारावासं वाटतं सतत काही ना काही वाटतं थोडक्यात इट्स लाईक
टोट्टल इन्सानिटी.
अथ उवाचलो आता इति गणेश वसईकरांच्या म्हणण्याला अनुमोदन देत
महेशालीलापंडितांची कविता भाषिक उलाढाल ,भाषिक राजकारण , वैचारिक, आर्थिक व
आयुष्यातील अभावाची, भीतीची नाकर्तेपणाची सूक्ष्मातिसूक्ष्म पातळीवर नोंद घेत असल्याने

तिचं वाचन करण्याआधी आपल्याला आकलनाच्या सर्व खिडक्या उघड्या ठेवणे गरजेचे
राहील.
अ थे ती
महेशालिलापंडित
पार प्रकाशन
मूल्य 160 रुपये

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *