पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
………………………………………………..
पंढरपूर Live 5 August 2017
निरागस हास्य आणि सौंदर्याची मुर्ती….जेनेलिया डिसुजा-देशमुख वाढदिवस विशेष..!
आपल्या निरागस सौंदर्याने आणि अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली महाराष्ट्राची लाडकी सून जेनेलिया डिसुजा-देशमुख . महाराष्ट्रचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची सुन व बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख याची लाडकी पत्नी जेनेलिया डिसुजा-देशमुख.. आज ५ आॅगस्ट जेनेलियाचा ३० वा वाढदिवस आहे. जेनेलिया ही बॉलिवूड अभिनेत्री तथा एक मॉडेल आणि होस्टसुद्धा आहे.
तिचा जन्म ५ आॅगस्ट १९८७ रोजी मुंबईत झाला आहे. आपल्या निरागस हसण्याने आणि अभिनयाने तिने बॉलिवूडशिवाय जेनेलियाने साऊथ फिल्म इंडस्ट्रीतसुद्धा आपला जम बसवला आहे. या दोन्ही इंडस्ट्रीत तिने अनेक चित्रपटातून काम केले आहे.
बॉलीवूडपेक्षा तिला साउथ इंडस्ट्रीत चांगले यश मिळाले. साउथमध्ये तिने अनेक हिट चित्रपटातून काम केले आहे. तर बॉलीवूडमध्ये तिने तुझे मेरी कसम या चित्रपटातून आगमन केले. याच चित्रपटातूनही रितेश देशमुखने देखील आपल्या करिअरची सुरुवात केली. दरम्यान, या चित्रपटाच्यावेळीच या दोघांमध्ये सुत जुळले आणि पुढचे 9 वर्ष ते एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. दरम्यान, जेनेलीयाने जाने तू या जाने ना, फोर्स, तेरे नाल लव्ह हो गया, मस्ती, चान्स पे डान्स या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय जेनेलियाने अनेक जाहिरातीसुद्धा केल्या असून एक टीव्ही रिअँलिटी शोही होस्ट केला आहे.
‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटापासून रितेश आणि जेनेलियाचा सुरु झालेला प्रेमाचा प्रवास अखेर 9 वर्षानंतर लग्नगाठ बांधल्यानंतर थांबला. 3 फेब्रुवारी २०१२ मध्ये हे दोघे विवाहबद्ध झाले. सध्या जेनेलिया दोन मुलांची आई आहे. तरीदेखील तिने आपल्या करिअरकडे दुर्लक्ष केले नाही. अशा या निरागस हास्याच्या अभिनेत्रीस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
……………………………………………………………………………………………………………………….
……………………………………………………………………………………………………………………….
……………………………………………………………………………………………………………………….
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111









