👁 9 Views

लातूरमधून हरवलेल्या तेरा मुली परतल्या घरी..! तर अनेकींनी थाटला संसार!

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application 

 सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

 ………………………………………………..

पंढरपूर Live 11  August 2017

लातूर- पोलिसांच्या दप्तरी हरवलेल्या मुलींची चक्क तस्करी झाली, अशा बातम्या वाहिन्यांवरून प्रसारित झाल्यामुळे खळबळ उडाली. त्यामुळे गेल्या पाच दिवसांत पोलिसांनी हरवलेल्या मुलींना शोधून काढण्याची मोहीमच हाती घेतली. यात हरवलेल्या १३ मुली आपल्या घरी पोहोचल्या असून यातील फिर्यादींनी पोलिसांना याची कल्पनाच दिली नसल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, चालू वर्षात हरवलेल्या ११ आणि गेल्या वर्षी हरवलेल्या दोन मुलींचा शोध सुरू असून काही मुलींचा पत्ता पोलिसांना मिळाला आहे. यातील अनेकींनी संसार थाटल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

पुढे वाचा

गेल्या आठवडाभरात लातूरच्या गल्लीपासून राज्याच्या विधिमंडळापर्यंत ‘लातूरमधून ३०० मुलींची तस्करी’ झाल्याचा विषय चांगलाच गाजला. मुलींची तस्करी कुणी केली, ३०० हा आकडा कोठून आला, याबाबत कसलीच अधिकृत नोंद नसतानाही ३०० मुलींची तस्करी झाल्याचे छातीठोकपणे सांगण्यात आले. याबाबत विधिमंडळात मुद्दा आल्यानंतर पोलिसांनी गेल्या तीन वर्षांत हरवलेल्या मुलींचे रेकाॅर्ड शोधून काढले. लातूर पोलिसांंच्या नोंदीनुसार २०१५ मध्ये ६० मुली हरवल्या होत्या. त्यातील सर्वच मुलींना पोलिसांनी शोधले. २०१६ मध्ये ६१ मुली हरवल्याच्या तक्रारी आल्या. त्यातील ५९ मुलींना शोधण्यात आले. तर जानेवारी ते जुलै २०१७ पर्यंत ५९ मुली हरवल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यातील ३५ मुलींना शोधण्यात आल्याचे निष्पन्न झाले. पोलिस अधीक्षक शिवाजी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने या वर्षात हरवलेल्या २४ मुली अद्याप सापडल्या नसल्याचे पुढे आल्यानंतर त्यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. त्यासाठी पोलिस २४ फिर्यादींच्या घरी गेल्यानंतर त्यातील १३ जणांनी आपल्या मुली नातेवाइकांकडे गेल्या होत्या. त्या तेव्हाच परत आल्याचे सांगितले. मात्र, याविषयी जेथे तक्रार दिली होती त्या ठाण्यात कळवले नसल्याचे त्यांनी सांगितले.

अनेक मुली संसारात रमल्या

चालू वर्षातील ११ आणि मागील वर्षातील २ अशा केवळ १३ मुलींचाच शोध घेणे राहिले असल्याचे राठोड यांनी सांगितले. त्यातही या १३ पैकी ११ मुलींचे पत्ते मिळाले असून दोन दिवसांमध्ये त्यांचा शोध घेतला जाईल. त्यातील अनेक जणी सुखी संसारात रमल्या असल्याचे समजते. मात्र, त्या सापडल्याची व सुखरूप असल्याची कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. काय होते प्रकरण

मागील महिन्यात येथील दीपज्योतीनगरमधील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन सातारा जिल्ह्यातील तासगाव येथे बळजबरी विवाह लावल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणात मध्यस्थ टोळक्याने अल्पवयीन मुलीला वधू म्हणून पुरवण्यासाठी मोठा आर्थिक सौदा केल्याचाही पोलिसांचा अंदाज असून १० जणांच्या टोळक्याला पोलिसांनी गजाआड केले आहे.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *