पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व
Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
………………………………………………..
पंढरपूर Live 14 August 2017
सोलापूर दि. 14 :- सायंटिस्ट इनचार्ज, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च संस्थेमार्फत अणुउर्जा विभाग व भारतीय अवकाश संशोधन विभागाच्या सहकार्याने 30 ऑगस्ट 2017 पर्यंत हैद्राबाद येथून 10 बलून फ्लाईट अवकाशात सोडण्यात येणार आहेत. सदर बलून फ्लाईटमध्ये संशोधनाकरिीता आवश्यक वैज्ञानिक उपकरणे असून बलून फ्लाईट 17 ते 30 किलोमीटर उंचीवर केल्यानंतर त्यातील वैज्ञानिक उपकरणे पॅराशूटच्या सहाय्याने जमिनीवर सोडण्यात येणार आहेत.
पॅराशूटच्या सहाय्याने दिनांक 1 ते 30 ऑगस्ट 2017 या कालावधीत जमिनीवर सोडण्यात येणारे उपकरणे जिल्ह्यातील विविध गावांमध्ये पडण्याची शक्यता आहे. अशी उपकरणे जमिनीवर पडल्यास नागरीकांनी घाबरुन जावू नये. जमिनीवर पडलेल्या उपकरणाची माहिती त्वरीत जिल्हा प्रशासन व स्थानिक प्रशासनास द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


