पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व
Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
पंढरपूर Live 16 August 2017
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ‘स्वेरीयन’या त्रेमासिकाचे तसेच चारही महाविद्यालयाच्या विविध विभागांच्या अहवालाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ‘स्वेरीयन’चे संपादक डॉ.प्रशांत पवार म्हणाले,‘ न्यायव्यवस्था, रस्ते, शेतकरी समस्या हे महत्वपूर्ण विषय आहेत. तिथे, खेळ, कला व संशोधन या जीवन दर्जा उंचावणाऱ्या गोष्टी हौसेच्या मानल्या जातात परंतू आपले महाविद्यालय या मुलभूत समस्यांवर संशोधन करीत असल्याने हे संशोधन उपयोगाचे व गरजेचे ठरत आहे’ डिप्लोमाचे प्राचार्य प्रा मिसाळ यांनी देखील स्वातंत्र्याची महती सांगणाऱ्या भाषणातून समाजातील घडामोडींवर प्रकास टाकला. यावेळी कोरके पाटील, संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.रविंद्र कुलकर्णी, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा.सतीश मांडवे, विद्यार्थी अधिष्ठाता प्रा.एस.आर.गवळी,सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.एस.एम.शिंदे, प्रा.यशपाल खेडकर, चारही महाविद्यालयाचे अधिष्ठाता,विभाग प्रमुख,प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह चारही महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. सुत्रसंचालन विजया गुंड,अरुणा पुजारी व ऋशभ जाधव यांनी खास शैलीत करून आभार मानले .
३.स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ‘स्वेरीयन’ या त्रेमासिकाचे प्रकाशन करण्यात आले.याप्रसंगी डावीकडून संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे प्रमुख डॉ.प्रशांत पवार, डिप्लोमा पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगचे

