सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
व Android Application पंढरपूर Live
येथे आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
परिणाम बघा..!!
व Android Application पंढरपूर Live
येथे आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
परिणाम बघा..!!
मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
पंढरपूर Live 19 August 2017
पंढरपूर,दि.19: ह.भ.प. निवृत्ती महाराज वक्ते यांनी वारकरी सांप्रदायाची परंपरा अधिक समृध्द केली आहे, असे गौरोदगार पालकमंत्री विजय देशमुख यांनी काढले.
राज्य शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने दिला जाणारा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार आज ह.भ.प. निवृत्ती महाराज वक्ते यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. पंढरपूर येथील जगदगुरु संत तुकाराम महाराज भवन येथे हा कार्यक्रम झाला. श्री.मारोती महाराज कुव्हेकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर आमदार भारत भालके, दत्तात्रय सावंत, नगराध्यक्षा साधना भोसले, माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, सांस्कृतिक कार्यसंचालक संजय कृष्णाजी पाटील, उपसचिव संजय भोकरे आदी उपस्थित होते.
श्री. देशमुख म्हणाले, निवृत्ती महाराज वक्ते यांनी वारकरी परंपरा लोकाभिमुख केली. किर्तन आणि पाठाच्या माध्यमातून त्यांनी व्यसनमुक्ती, पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. त्यांनी लिखाण करुन संत साहित्याचे वाचन अधिक समृध्द केले आहे. श्री देशमुख यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांचा संदेश वाचून दाखवला. पाच लाख रुपये रोख, मानपत्र आणि शाल असे पुरस्काराचे स्वरुप आहे. यावेळी आमदार भारत भालके, दत्तात्रय सावंत यांचीही भाषणे झाली. श्री संजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. आभार उपसचिव भोकरे यांनी मानले. यावेळी भक्ती-सरिता हा भक्ती संगीताचा कार्यक्रम सादर करण्यात आला.