11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
पंढरपूर Live 21 August 2017
सोनगिर धुळे (नंदकुमार देशपांडे यांचेकडून):- महाराष्ट्रात गर्वाने नाव घेण्यासारखी एकच अशी ग्राहक पंचायत आहे. ग्राहक हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. सर्वसामान्यांपासून राष्ट्रपतींपर्यंत, गोरगरीबांपासून श्रीमंतांपर्यंत मग कोणीही असो तो ग्राहकच आहे. ग्राहकांचे संरक्षणासाठी सर्वांचे अधिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. ग्राहकांचे जे आठ अधिकार आहेत; त्याची माहिती प्रत्येक ग्रामपंचायतीच्या कार्यालयात, कार्यालयाबाहेर तक्ता रुपात लावावेत व यासाठी आग्रह करावा असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी केले.धुळे सोनगिर येथील आनंदवन आश्रमात आयोजित केलेल्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र चे दोन दिवसीय कार्यकर्ता शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी राज्यअध्यक्ष विजय लाड होते तर प्रमुख राज्य संघटक सर्हेराव जाधव गुरुजी आदी होते.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र चे मुखपत्र ग्राहकतिर्थ या अंकाचे प्रकाशन केंद्रीय राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. विजय लाड राज्य अध्यक्ष, राह्य संघटक सर्जेराव जाधव, सहसंघटक सौ.मेधा कुलकर्णी, सचिव अरुण वाघमारे, ग्राहक पंचायतचे महासचिव प्र.वि. कुलकर्णी सर, ग्राहकतिर्थचे संपादक गुरुराज बहिरट, सहसंपादक डॉ.राजेश फडे, ग्राहक पंचायत चे अध्यक्ष नंदकुमार देशपांडे, सागर रणदिवे, मिलींद वाईकर, प्रसाद जोशी, जिल्हा संघटक श्रीकांत बाविस्कर, सौ.अॅड.श्रध्दा बहिरट, सौ.सविता देशपांडे आदी उपस्थित होते.

समारोपप्रसंगी बोलताना राज्य अध्यक्ष विजय लाड म्हणाले, ग्राहक चळवळीस वाहून घेतलेले हे सर्व ग्राहक पंचायतच्या पालखीचे भोई या दोन दिवस कार्यकर्ता मेळाव्यास गजर राहिले. या मेळाव्यातून सर्व कार्यकर्ते उर्जा घेवून जावून जोमाने कार्य करतील. या कार्यक्रमास आलेले प्रमुख केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी ग्राहक पंचायतीस सहकार्य करण्याचे सांगून मी लक्ष देतो असे सांगितले. नाना यांचे योगदान हे कार्यकर्त्यांचे उर्जा स्त्रोत आहे. केंद्रीय सतर्कता आयोगास जोडलेली ग्राहक पंचायत एकमेव संघटना आहे. असे सांगितले.
हे शिबीर यसस्वी होण्यासाठी सोनगिर धुळे येथील डॉ.रविंद्र महाजनी, कल्पेश देशमुख, बापुसाो देसाई, आरीफ पठाण, शेखर देशमुख यांचेसह ग्राहक पंचायत व सोनगिर चे कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.


