👁 6 Views

आदरयुक्त संस्कृती व शिस्त म्हणजे शैक्षणिक विकासाचा पाया – संस्थापक सचिव डॉ. बी. पी. रोंगे

गणेशोत्सवानिमित्त व महालक्ष्मी सणानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!

    • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
    • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
    • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
    • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    पंढरपूर Live 31 August 2017

    प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी,बी व डी.फार्मसी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत
    प्रथम वर्ष अभियांत्रिकीत प्रवेश घेतलेले विद्यार्थी व पालक.

    .प्रथम वर्ष अभियांत्रिकीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत प्रसंगी मार्गदर्शन करताना श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूटचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे सोबत डावीकडून पालक प्रतिनिधी हनुमंत यादवमहीला पालक प्रतिनिधी सौ. मनीषा जगदाळेउपप्राचार्य प्रा.एस.एन.कुलकर्णी आदी.

    पंढरपूरः-आदरयुक्त संस्कृती व शिस्त म्हणजे शैक्षणिक विकासाचा पाया असून या ठिकाणी सामान्य बुध्दीमत्तेचा विद्यार्थीसुध्दा कठोर परिश्रमाच्या जोरावर शिक्षकवर्ग देत असलेल्या योग्य दिशा व अचूक मार्गदर्शनामुळे स्वतःचे असे उज्वल भाविष्य निर्माण करु शकतो.’ असे प्रतिपादन श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट,पंढरपूरचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी केले.
           श्री विठ्ठल पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजिलेल्या प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकीप्रथम वर्ष बी.फार्मसी व डी.फार्मसीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ प्रसंगी मुख्य मार्गदर्शक म्हणून स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. रोंगे बोलत होते. प्रारंभी सर्व विद्यार्थी व पालकांचे गुलाबपुष्प देवून स्वागत केले. व्यासपीठावर या प्रसंगी पालक प्रतिनिधी म्हणून हनुमंत यादव तर महिला पालक प्रतिनिधी म्हणून सौ. मनीषा जगदाळे ह्या उपस्थित होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे पालक संघाचे अध्यक्ष आबासाहेब दैठणकर हे होते. प्रारंभी डॉ. डी.एस. चौधरीप्रा. सुनील भिंगारे व शिवाजी गायकवाड यांनी उपस्थितांना अभ्यासाची क्षमता,त्याला लागणारा कालावधीप्रॅक्टिस सेशन,रात्र अभ्यासिका,प्रश्नसंच सोडविणेपंढरपूर पॅटर्नट्रिपल पी.ईअद्यावत सुविधाउपलब्ध साहित्य साधनेअभ्यासाची पध्दत,गरीब व होतकरु विद्यार्थ्यांसाठी असणारी कमवा व शिका योजनावसतिगृह सुविधा आदींची सविस्तर माहिती उपस्थितीतांना दिली. महिला पालक प्रतिनिधी म्हणून बोलताना सौ. मनीषा जगदाळे म्हणाल्या की, ‘या महाविद्यालयात विद्यार्थांचे उज्वल भविष्य असल्यामुळेच महाविद्यालय प्रवेश संख्यावार्षिक परीक्षेचानिकाल व कॅंपस प्लेसमेंट मध्ये अव्वलस्थान रहात आहे. अभियांत्रिकी क्षेत्रात करीअर करतानातंत्रज्ञान विशयक प्राथमिक ज्ञान भक्कम करण्यासाठी हा पंढरपूर पॅटर्न अतिशय उपयुक्त आहे.’ यावेळी पालकांच्यावतीने बोलताना यादव म्हणाले की, ‘या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिक्षणाची पध्दत पाहिल्यास भविष्यात नोकरी मागण्याऐवजी नोकरी देणारेच जास्त निर्माण होताहेत. त्यामुळे पालकवर्ग पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी स्वेरीलाच प्राधान्य देतात.विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कॉलेज प्रशासन अत्यंत काळजी घेतात त्यामुळेच मुलींची संख्या इथे अधीक जाणवते.वसतिगृह अधिक्षक प्रा. पवार सरांच्या चौकस नेतृत्वामुळे पालकवर्ग निश्चिंतअसतात.यावेळी पालकांनी मनोगतातून महाविद्यालयाच्या उत्कृष्ठ नियोजनाबध्दल समाधान व्यक्त केले.पालक मेळाव्यात अनेकांनी प्रश्न विचारले यावर डॉ. रोंगे यांनी काही प्रश्न जागेवरच सोडविल्या तर काही प्रश्न अल्पशा कालावधीत सुटल्या जातील’ असे सांगितले. अध्यक्षीय भाषणात दैठणकर म्हणाले की,  स्वेरीत प्रवेश घेतलेल्या विध्यार्थ्यांचे भविष्य उज्वल असून ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील आता शहरातील विध्यार्थ्यांच्या पुढे जाताना दिसत आहे. येथील शिस्त व संस्कार यामुळे विद्यार्थी कोणत्याही नोकरीला सामोरे जातो.’ यावेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या सर्व कलागुणांची माहिती देणाऱ्या माहिती पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. याप्रसंगी बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ.आर.जी.कुलकर्णीडी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवेपदवी अभियांत्रिकीचे उपप्राचार्य डॉ. एस.एन. कुलकर्णीअधिष्ठाता डॉ.एस.एम.मुकणेअधिष्ठाता डॉ. पी.एस.कचरेडॉ. विभूतेडॉ. खडकेसी.एस.ई. विभागप्रमुख प्रा. व्ही.डी. जाधवविद्यार्थी अधिष्ठाता प्रा. सचिन गवळी,सचिन पाटीलविश्वजित कोरके पाटील,महाराष्ट्रातील विद्यार्थी व त्यांचे पालक आदी जवळपास उपस्थित होते. प्रा. यशपाल खेडकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले तर प्राचार्य प्रा. एन.डी. मिसाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.
     
    From-
    Shri. Santosh  C. Halkude
    Pandharpur – 413 304. 
    Mob: 9545 55 36 28, 

              9850 24 21 55 .
  • पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !
    • सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
    • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
    • मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111 

    Comments

    No comments yet. Why don’t you start the discussion?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *