👁 9 Views

कालव्यातून यमाई तलावाला पाणी सोडले नगराध्यक्षा सौ. साधना नागेश भोसलेंच्या मागणीला यश


 गणेशोत्सवानिमित्त व महालक्ष्मी सणानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!

    • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
    • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
    • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
    • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    पंढरपूर Live 31 August 2017



        येथील शहरातील यमाई तलावातील पाण्यांची गेल्या काही महीन्यापासून घट झाली आहे. अशामधेच सध्या उजनी धरणाने शंभरी गाठली आहे. त्यामुळे  कालव्यामधून येथील यमाई तलावास पाणी सोडण्याची मागणी नुकतीच नगराध्यक्षा सौ. साधना नागेश  भोसले यांनी केलेली होती. त्यानुसार आजपासून यमाई तलावामधे पाणी सोडण्यास सुरूवात झालेली आहे. 
          शहरास चंद्रभागेच्या नदीमधून पाणी पुरवठा होत असतो. मात्र पूर्वी येथील यमाई तलावामधून शहरास पाणीपुरवठा होत असल्यांचे काही जाणकार मंडळी  आज सांगतात. त्यानंतर गेल्या काही वर्षामधे यमाई तलावाचे सुशोभिकरण करण्यात आले. अशामधेच मध्यंतरीच्या काळामधे एकदा कालव्यामधून यमाई तलावामधे पाणी सोडण्यात आलेले होते.

       सध्या उजनी धरण शंभर टक्के पूर्ण भरले गेलेले आहे. अशा स्थितीमधे सध्या कालवा , आणि नदीला देखिल मोठया क्षमतेने पाणी सोडण्यात आलेले आहे.  यामधेच सध्या उजनीतील पाण्याने सर्व ओढे , तलाव , कालवे , नद्या आणि बंधारे हे संपूर्ण भरून घेण्याच्या सुचना करण्यात आलेल्या आहेत. 

       यामधेच पंढरपूर शहराच्या मध्यवर्ती भागांमधे असणारे यमाई तलाव हे पूर्ण क्षमतेने पाण्याने भरून घेण्यात यावे. यासाठी कालव्यामधून सदरचे पाणी हे सध्या यमाई तलावामधे येत आहे. हे पाणी साधारणपणे शुक्रवारपर्यत संपूर्ण क्षमतेने तलावामधे येईल. आणि यानिमित्ताने यमाई तलाव हे पूर्ण भरू शकणार आहे.    सध्या कालव्यांचे संपूर्ण दारे हे उघडे करण्यात आलेले आहे. त्यामुळे  मोठया गतीने पाणी यमाई तलावामधे येत आहे. तालुक्यातील तिसंगी तलाव हा भरला गेला आहे. त्यामुळे  तेथीलच नीरा भाटघर आणि उजनीच्या कालव्यामधून हे पाणी यमाई तलावामधे येत आहे.    शहरातील महत्वांचे असणारे आणि शहरवासिंयाचा ऑक्सिजन पॉइंट म्हणून गणले जाणारे यमाई तलावामधे देखिल पाणी असावे. यासाठीच नगराध्यक्षा सौ. साधना नागेश भोसले यांच्या प्रयत्नामधून यमाई तलावामधे मोठया क्षमतेने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे  यांचा शहरवासिंयाना लाभच होणार आहे.

  • पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !
    • सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
    • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
    • मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111 

    Comments

    No comments yet. Why don’t you start the discussion?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *