👁 9 Views

भटक्या विमुक्त जाती मुक्तीदिना चे औचित्य साधुन जय बजरंग गणेशोत्सव तरुण मंडळाकडून भटक्या विमुक्तांना सन्मान..!

  • गणेशोत्सवानिमित्त  सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!
  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
  • पंढरपूर Live 2 september  2017 

    पंढरपूर(प्रतिनिधी):- पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगाव भटकणारे भटके विमुक्त जातीच्या समाजबांधवांना प्रस्थापितांच्या जोखडातून सोडवण्याचा व सन्मान मिळवून देण्याचा आजचा दिवस म्हणजेच ‘भटक्या विमुक्त जाती मुक्ती दिन’ होय. या दिवसाचे औचित्य साधून आज पंढरपूरमधील रामबाग रोडच्या ‘जय बजरंग तरुण मंडळाने’ आपल्या मंडळाच्या ‘श्री’ च्या आरतीचा मान या समाजबांधवांना देऊन त्यांचा सत्कार केला. ‘‘समाजासाठी स्वत:चं आयुष्य वेचणार्‍या परंतु समाजाकडूपन कसल्याही मदतीची अपेक्षा न करणार्‍या वरील समाजसेवकांना सन्मानीत करताना जो आनंद झाला तो शब्दात सांगणं अवर्णनियच..!’’ हा आनंद आम्हाला व आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना नवे ‘बळ’ व नवी ‘उर्जा’ देऊन गेला असल्याची  नगरसेवक विक्रम शिरसट यांनी प्रसिध्दीस दिलेल्या एका पत्रकाद्वारे दिली आहे.
    डवरी, कोड, डोंबाळी, गोंधळी आदी भटक्या विमुक्त जमात बांधवांच्या शुभहस्ते आजची ‘श्री’ ची आरती व पुजा संपन्न झाली. यावेळी उपस्थित राहिलेल्या या सर्व समाजबांधवांचा यथोचित सत्कारही करण्यात आला. या मंडळाने या आधीच्या पुजेचा व आरतीचा मान उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करणारे मनोज पवार, बेवारस प्रेतांना वाहुन नेणारे तुकाराम सर्वगोड, सर्पमित्र अशोक तळेकर, अप्पा करकमकर, शंभू नेहतराव आदींना दिला होता. 
    आजच्या ‘श्री’ च्या आरतीला नगरपरिषद पाणीपुरवठा सभापती विक्रम शिरसट, विक्रांत माने, अशोक कांबळे, बाळु माने, पप्पु सुरवसे, ॠषी अधटराव, सोनु माने, कृष्णा नेहतराव, आकाश माने, अनिकेत शिरसट, अनिकेत संगीतराव, 
    व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. 


    पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

    सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

    कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *