👁 11 Views

ग्राहक जागृत होणे गरजेचे! प्र. वि. कुलकर्णी

  • गणेशोत्सवानिमित्त  सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!
  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

पंढरपूर Live 2 september  2017 

क. औ. पाटील विधी महाविद्यालयात विद्यार्थी ग्राहक जागृती कार्यक्रम संपन्न!
पंढरपूर (प्रतिनिधी) – ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांच्या 86 व्या जयंती निमित्त ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा पंढरपूर आणि क. औ. पाटील विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने निबंध लेखन आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये त्यामधील विजेत्या स्पर्धकाना पारितोषिक वितरण आणि विद्यार्थी ग्राहक जागृतीचा कार्यक्रम आज येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य मिलिंद गजधने यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे महासचिव प्र. वि. कुलकर्णी सर हे होते. या प्रसंगी व्यासपीठावर ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे पुणे विभागीय सचिव प्रा. गुरुनाथ बहिरट, जिल्हा अध्यक्ष डॉ. राजेश फडे, जिल्हा सचिव/शहराध्यक्ष नंदकुमार देशपांडे, शहर सचिव दिनेश खंडेलवाल, महादेव खंडागळे आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यशस्वी स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली. यावेळी ग्राहक  यावेळी मार्गदर्शन करताना प्र. वि. कुलकर्णी यांनी सांगितले की, प्रत्येक व्यक्ती जन्मतःच ग्राहक असते. प्रत्येकाने सजग आणि सावधपणे व्यवहार केले, व्यवहाराच्या नोंदी व्यवस्थितपणे ठेवल्या तर ग्राहकाची फसवणूक होणे अशक्य आहे. याकरिता समाजातील विविध स्तरात ग्राहक जागृती होणे गरजेचे आहे. त्यानंतर प्रा. गुरुनाथ बहिरट यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी ग्राहक पंचायत 1973 पासून ग्राहक कल्याणासाठी कार्यरत आहे. सामान्य नागरिक आणि शासन यांच्या समन्वयातून शोषणमुक्त समाजाच्या निर्मीतीसाठी प्रयत्नशील आहे आणि अश्याच या वर्षानुवर्षांच्या अथक आणि असीम प्रयत्नांमुळेच 1986 मध्ये ग्राहक संरक्षण कायद्याची निर्मिती झाली असे सांगितले. शेवटी अध्यक्षीय भाषणात प्राचार्य मिलिंद गजधने यांनी सांगितले ग्राहकतीर्थ बिंदूमाधव जोशी यांच्या विचारांची आज समाजाला गरज असल्याचेही सांगितले.
कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ‍ॅड. सौ. श्रद्धा बहिरट यांनी केले तर सूत्रसंचालन महाविद्यालयातील प्राजक्ता शिंदे यांनी केले, शेवटी आभार प्रदर्शन गोविंद शर्मा यांनी केले.
फोटो लाईन – निबंध स्पर्धेतील प्रथम पारितोषिक कु. साळुंखे हिस वितरण करताना प्र. वि. कुलकर्णी सर प्राचार्य मिलिंद गजधने, प्रा. गुरुनाथ बहिरट, नंदकुमार देशपांडे, डॉ. राजेश फडे दिनेश खंडेलवाल, महादेव खंडागळे उपस्थित मान्यवर…….


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *