👁 13 Views

प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेसाठी 15 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करा – निवृत्त कॅप्टन विद्या रत्नपारखी

  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 13  september  2017 
               मुंबई, दि. 13 प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेसाठीwww.ksb.gov.in  यावर 15 नोव्हेंबर दुपारी 2 वाजेपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त कॅप्टन विद्या रत्नपारखी यांनी केले आहे.
          इयत्ता 12 वी/पदवी/पदविका परीक्षेमध्ये कमीत कमी 60 पेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण होऊन मान्यताप्राप्त व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमासाठी सन 2017-18 मध्ये प्रवेश घेतलेल्या माजी सैनिकांची, विधवांचे पाल्य तसेच विधवा यांना प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजना लागू आहे. केंद्रीय सैनिक बोर्ड नवी दिल्ली यांच्याकडून देशातून  प्राप्त झालेल्या लाभार्थ्यांना त्यांनी प्राप्त केलेल्या गुणानुक्रमे, वर्गवारीनुसार एकूण 5 हजार 500 पाल्यांना वाटप करण्यात येते.
           त्यामध्ये मुले आणि मुलीं यांना प्रत्येकी समान 2750 शिष्यवृत्तींचे वाटप करण्यात येते. या शिष्यवृत्ती अंतर्गत मुलांना 24 हजार रुपये व मुलींना 27 हजार रुपये प्रतीवर्ष शिष्यवृत्ती अदा  केली जाते.
           या शिष्यवृत्तीसाठी अधिकृत अभ्यासक्रमाची यादी तसेच इतर अनुषंगिक माहिती केंद्रिय www.ksb.gov.in वर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहनही श्रीमती रत्नपारखी यांनी केले आहे.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *