- 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 13 september 2017
मुंबई, दि. 13 : ग्रंथालय संचालनालयामार्फत सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांना ग्रंथालय शास्त्राचे प्रशिक्षण देऊन दरवर्षी जून महिन्यात परिक्षा घेण्यात येते. या परीक्षेचे निकाल नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत.
जून 2017 मध्ये राज्यातील 28 जिल्हास्तरीय केंद्रामधून एकूण 1398 विद्यार्थ्यांना परीक्षा दिली होती. त्यापैकी 843 विद्यार्थी उत्तीर्ण तर 555 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. सदर परीक्षेच्या निकालाची टक्केवारी 60.19% आहे. राज्यात सर्वाधिक निकाल औरंगाबाद (जिल्हा संघ) आणि हिंगोली केंद्राचा 100% असून वाशिम केंद्राचा सर्वात कमी 28.57%निकाल आहे. तर विभागामध्ये अमरावती विभागाचा सर्वाधिक 71.15%आणि नागपूर विभागाचा सर्वात कमी 47.76% निकाल लागला आहे. परीक्षेचा निकाल संचालनालयाच्या www.dolmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर 24 ऑगस्ट 2017 रोजी अपलोड करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना गुणपत्रिका त्यांच्या केंद्रावर 6 सप्टेंबर 2017 पासून मिळत आहेत.
ज्या विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांबाबत फेरगुणमोजणी करावयाची आहे, त्यांनी प्रत्येक विषयास प्रत्येकी दहा रुपये प्रमाणे शुल्क आणि अर्ज संबंधित वर्ग व्यवस्थापकांकडे 15 सप्टेंबर 2017 पर्यंत पाठवावेत. वर्ग व्यवस्थापकांनी एकत्रितपणे जमा झालेले शुल्क शासकीय कोषागारात जमा करावे. वर्ग व्यवस्थापकांनी फेरगुजमोजणीचे विद्यार्थ्यांचे अर्ज आणि चलनाची प्रत ग्रंथालय संचालनालयाकडे 25 सप्टेंबर 2017 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. यानंतरचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत असे आवाहन ग्रंथालय संचालक किरण धांडोरे यांनी केले आहे.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे

