- 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
बनकर कुटूंबिय हे सांगोला येथे मजुरी करुन आपला व आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात एक इयत्ता नववीमध्ये तर दुसरा इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेत असलेली अशी दोन मुलं आहेत. आईवडीलांचा एकमेव आधारच अचानक नाहीसा झाल्याने या दोन्ही मुलांचं छत्रंच जणु हरवलं आहे. आईवडीलांव्यतीरिक्त कुणाचाही आधार नसलेली ही मुलं आता पोरकी झाली आहेत. त्यांच्या शिक्षणासाठी प्रशासनाकडून सहकार्य मिळावे अशी मागणी होत आहे.
पंढरपूर तालुक्यातील मुंडेवाडी येथिल बंधार्यावरुन पाणी वाहत असतानाही सांगोला तालुक्यातील पती पत्नी दुचाकीवरून जात असताना भीमा नदीत वाहून गेल्याची दुर्घटना काल गुरुवार दि. 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 च्या दरम्यान घडली. सांगोला पुजारवाडी येथील सुरेश विष्णु बनकर (वय 45) आणि त्यांच्या पत्नी सौ. वंदना सुरेश बनकर (वय 32) हे दुचाकीवरून पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली येथे वंदना यांच्या आजारी मावशीला भेटण्यासाठी गेले होते . संध्याकाळी 7 च्या सुमारास ते अनवली गावाला जाण्यासाठी निघाले . परंतु बंधार्यावरुन जात असताना पाण्याच्या वेगाचा अंदाज न आल्याने दुचाकीवरून बंधार्यावरुन प्रवास करताना मोटारसायकलसह दोघे वाहुन गेल्याची दुर्घटना घडली.
अनवली हे सौ. वंदना यांचे माहेर होते . रात्रीचा मुक्काम माहेरी करुन हे दांपत्य सकाळी सांगोल्याला आज आपल्या घरी जाण्यासाठी निघाले होते. भीमा नदीत उजनी धरणातुन 40 हजार क्यूसेकचा विसर्ग भीमेत सोडल्याने नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली गेले आहेत. मुढेवाडी बंधार्यावर देखील पाणी आल्याने दुचाकीवरुन जाणारे बनकर दांपत्य वाहून गेले असुन स्थानिकांनी दुर्घटना घडली तेंव्हाच मदतकार्य सुरु केले होते पण अंधार असल्याने अडचणी निर्माण झाल्या. तेंव्हापासून या दांपत्याचे शोधकार्य सुरू होते. काल सायंकाळी सुरेश बनकर यांचा मृतदेह नळी येथील नदी पात्रात सापडला तर आज सकाळी त्यांच्या पत्नीचाची मृतदेह मिळाला. या घटनेमुळे बनकर यांच्या गावासह सांगोला व पंढरपूर तालुक्यातून सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून बनकर यांच्या पुजारवाडी, ता.सांगोला या गावावर शोककळा पसरली आहे.



