👁 11 Views

“फडणवीस सरकारच्या काळात 65 हजार कोटींचा घोटाळा” दखल घेणार- अर्थमंत्री जयंत पाटील

Pandharpur Live :  देवेंद्र फडणवीस सरकारच्या 2015 ते 2018 पर्यंत झालेल्या कामांचा हिशेबच मिळत नसल्याचं सांगत कॅगने ठपका ठेवला होता. या प्रकरणाची योग्य ती दखल घेणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अर्थमंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या काळात 65 हजार कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. 2018 पर्यंत झालेल्या कामांचा ताळमेळ नसल्याचा संशय कॅगने व्यक्त करत ताशेरे ओढले आहेत. याची दखल घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
आमचं चौकशी सरकार नाही, पण जे रेकॉर्डला आहे त्याची आम्ही दखल घेऊ. कॅगच्या मुद्द्यांची नोंद घ्यावी लागेल, असं पाटील म्हणाले आहेत. त्यामुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, 2018 पर्यंतच्या कालावधीत 65 हजार 921 कोटी रुपयांच्या कामांची 32 हजारांपेक्षा जास्त उपयोगिता प्रमाणपत्र सरकारने सादर केलेली नाहीत, असं कॅगने म्हटलं आहे. यावरुन विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा…
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________

_________________________________________________

_________________________________________________

_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

_________________________________________________
_________________________________________________

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *