👁 11 Views

केंद्रीय पर्यटन सूचीमध्ये पंढरपूरची नोंद करा! वारकरी मंडळाची मागणी

Pandharpur Live : 
तिर्थक्षेत्र पंढरपूर हे दक्षिण काशी मानले जाते.आषाढी वारी हा विश्वातील भव्य दिव्य सोहळा पंढरपूर येथे होत असतो. वर्षभरामध्ये किमान 50 लाखांपेक्षा जास्त भाविकांचे येणे पंढरपूरला होत असते. त्यामुळे पंढरपूर हे तिर्थक्षेत्र भारताच्या केंद्रीय पर्यटन सूचीमध्ये नोंदवून केंद्राकडून विकास करणेसाठी अखिल भारतीय वारकरी मंडळाकडून ह.भ.प.सुधाकर इंगळे महाराज (प्रदेशाध्यक्ष) व शिष्ट मंडळाने निवेदन देवून खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्याशी चर्चा केली.

केंद्र सरकारच्या माध्यमातून भारतातील अनेक तीर्थ क्षेत्रांचा विकास झालेला आहे. त्यापध्दतीने पंढरपूर तीर्थ क्षेत्रांचा ही विकास केंद्राकडून होण्यासाठी पर्यटन सूची मध्ये नोंद होणे खूपच गरजेचे आहे.

आषाढी वारीला राज्य शासनाकडून दोन कोटींचा निधी नगरपरिषदेला मिळतो.तो वर्षभरासाठी वापरला जात असल्यामुळे आषाढी वारीला केंद्राकडून दरवर्षी दोन कोटी रूपये निधी उपलब्ध करून घेऊन भाविकांच्या सोयी सुविधांसाठी विशेष प्रयत्न करावे अशी ही सविस्तर चर्चा याप्रसंगी करण्यात आली. या शिष्ट मंडळामध्ये बळीराम जांभळे (जिल्हासचिव), महेश जाधव (शहर उपाध्यक्ष), निवृती पवार (तालुका अध्यक्ष), पंकज गुंड (तालुका उपाध्यक्ष), संतोष खलीपे(तालुका सचिव), बसवेश्वर जाधव, शिवानंद पाटील (नगरसेवक), कुमार गायकवाड, सोमनाथ ताकमोगे, गणेश शिंदे, दगडू तात्या डोंगरे, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा…
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________

_________________________________________________

_________________________________________________

_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

_________________________________________________
_________________________________________________

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *