👁 10 Views

“कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेल्लन उत्साहात संपन्न”

फोटो- आदर्श विद्यार्थी व पालक पुरस्कार प्रदान करताना मा.सौ.विनया परिचारक, प्राचार्या सौ शैला कर्णेकर,   इंजिनिअरींगचे प्राचार्य, डॉ.एस.पी.पाटील व पब्लिक स्कुलचे प्राचार्य, अभय सोनटक्के आदी मान्यवर.

Pandharpur Live : 
आजच्या स्पर्धेच्या युगात आई-वडिलांनी मुलांसाठी थोडा वेळ देणे आवश्यक आहे. जेणेकरुन आपला पाल्य काय करतो? काय नाही, त्याचे अभ्यासाकडे लक्ष आहे का? मोबाईलचा वापर जास्त होतो का? हे पालकांनी पहावे व योग्य ते मार्गदर्शन करावे. असे मत सौ.विनया उमेश परिचारक यांनी व्यक्त केले.

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित ‘कर्मयोगी विद्यानिकेतन’ प्रशालेमध्ये उत्कर्ष-२०१९ च्या वतीने ‘हास्यकल्लोळ व सरीवर सरी’ या थीमवर स्नेहसंम्मेलन उत्साहात पार पडले. हे संम्मेलन दोन दिवसांमध्ये घेण्यात आले.
सोमवार दि.२३/१२/२०१९ रोजी प्रि-प्रायमरी विभाग ‘उत्कर्ष-२०१९’ च्या वतीने ‘हास्यकल्लोळ’या विषयावर प्रस्तुत स्नेहसंम्मेलन घेण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. याप्रसंगी डॉ.गोडसे, डॉ.चव्हाण, श्री ताठे सर, प्राचार्या सौ कर्णेकर व रजिस्ट्रार श्री गणेश वाळके यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. याबरोबरच छोट्या बाल चमूंनी इंग्लिश वेलकम सॉग वर डान्स करुन पाहुण्यांचे स्वागत केले. यावर्षीचा आदर्श पालक पुरस्कार मा.श्री.व सौ.देशमुख यांना प्रशालेच्या प्राचार्या सौ शैला कर्णेकर यांच्या हस्ते देण्यात आला. या कार्यक्रमाचे वार्षिक अहवाल वाचन श्रीमती भाग्यश्री कोकणे यांनी केले. तसेच या संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कुमार तक्ष तुकाराम राऊत इ.सिनीअर के.जी. व आज्ञा नंदकुमार कवडे इ.सिनीअर के.जी. या दोन विद्यार्थांनी केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रुपाली फाळके यांनी केले. याप्रसंगी ‘हास्यकल्लोळ’ या विषयाद्वारे सर्व विद्यार्थ्यांनी मेहमुद, किशोरकुमार, चार्ली चॅप्लिन या कलाकारांचा कलाविष्कार दाखविला.

मंगळवार, दि.२४/१२/२०१९ रोजी घेण्यात आलेल्या ‘उत्कर्ष-२०१९-सरीवर सरी’ प्रस्तुत विषयांवर इ.१ली ते ९ वी विद्यार्थ्यांचे स्नेहसंम्मेलन घेण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन मा.श्री.उमेश परिचारक सर, मा.सौ.विनया उमेश परिचारक मॅडम, कर्मयोगी इंजिनिअरींगचे शेळवेचे प्राचार्य, डॉ.एस.पी.पाटील, पब्लिक स्कुल शेळवेचे प्राचार्य अभय सोनटक्के, संस्थेचे रजिस्ट्रार गणेश वाळके, प्रशालेच्या प्राचार्या सौ शैला कर्णेकर या मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पाहुण्यांचे स्वागत कर्मयोगीच्या वाद्यवृंदाने गायलेल्या स्वागतगीतावर करण्यात आले. प्राचार्या सौ शैला मॅडमनी पूर्ण वर्षाचे वार्षिक अहवाल वाचन केले. प्रथमतः कार्यक्रमाची सुरुवात एका सरप्राईज सॉंगने झाली. यात पालक व त्यांची मुलगी यांचा नृत्याविष्कार बघायला मिळाला. तसेच मुली या फक्त सुंदर व नाजुक न राहता स्व-संरक्षण करणा-या असायला हव्यात हे दर्शविण्यासाठी कमांडोच्या विद्यार्थीनींनी सुंदर अशी प्रात्यक्षिके दाखविली.
हे स्नेहसंम्मेलन ‘उत्कर्ष-२०१९’च्या वतीने ‘सरीवर सरी’ या विषयानुरुप थीमवर अतिशय उत्कृष्ठ पद्धतीने साजरे करण्यात आले. पावसाची होणारी सुरुवात ते पाऊस जोरदार पडेपर्यंत मुलांनी वेगवेगळ्या गाण्याच्या तालावर घेतलेली मजा आणि त्यानुसार त्यांनी केलेले अप्रतिम नृत्ये असा नेत्रदिपक सोहळा बघणे शाश्वतच आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही.
कर्मयोगीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला वाद्यवृंद, एकपात्री विनोद नाटीका ही कुमारी श्रद्धा गाजरे या विद्यार्थीनीने खुपच छान रंगवली. बघताना खरोखर एकपात्रीऐवजी सासू व सुनेची दोन पात्रे बोलत आहेत असे दर्शविले आणि पुर्ण प्रेक्षकांना खळखळून हसविले. विनोदी नाटिकेमध्ये “येड्यांची जत्रा” ही दहा मिनटांची नाटीका उत्कृष्ट पद्धतीने साकारली. प्रत्येक पात्रांनी पुर्णतः साकारलेली पात्रे प्रेक्षकांच्या समोर तंतोतंत उभी केल्यामुळे प्रेक्षकांनी टाळ्यांची दाद देवून या विनोदी पात्रांचे कौतुक केले. 
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कुमारी रिद्धी सावंत व कुमारी श्वेता कोरे या दोन विद्यार्थींनींनी सुंदर व स्पष्ट आणि मोजक्या व अर्थपुर्ण शब्दांचा वापर करुन सुत्रसंचालनाने कार्यक्रमास शोभा आणली.
या कार्यक्रमात प्रशालेच्या आदर्श विद्यार्थी व विद्यार्थीनींना पारितोषिके देण्यात आली. यामध्ये आदर्श विद्यार्थी कु.समर्थ गोपाळ वेल्हाळ व विद्यार्थीनी म्हणुन कुमारी समृद्धी संतोष मलपे यांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले. तसेच इ.१ली ते ४थी मध्ये आदर्श पालक म्हणून अनुक्रमे श्री. शरद राघु चव्हाण व सौ.गीता शरद चव्हाण तसेच इ.५ वी ते ९ वी मध्ये अनुक्रमे श्री रमेश शिंदे व सौ सुनिता रमेश शिंदे यांना मा.सौ.विनया परिचारक, इंजिनिअरींगचे प्राचार्य, डॉ.एस.पी.पाटील व पब्लिक स्कुलचे प्राचार्य, अभय सोनटक्के या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.
या कार्यक्रमास प्रेक्षकवर्गाचीही तितकीच उत्स्फुर्त साद मिळाली व कार्यक्रमाची सांगता वंदेमातरम या गीताने झाली याबरोबरच शाळेचे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या योगदानाने व कठोर परिश्रमाने  कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा…
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________

_________________________________________________

_________________________________________________

_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

_________________________________________________
_________________________________________________

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *