Pandharpur Live : –
महाराष्ट्र राज्यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रम साजरे होत आहेत. मात्र यात इतका मोठा जंगी कार्यक्रम महाराष्ट्रात फक्त पंढरपुरात आमदार भारतनाना भालके यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात येत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी केले.
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्यावतीने दि.20 डिसेंबर ते 25 डिसेंबर या कालावधीत दररोज विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करत शारदोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्राची लोकधारा, राज्यस्तरीय डान्स स्पर्धा, मी अनुभवलेले साहेब, सोलापूर जिल्ह्यातील कर्तृत्ववान 11 महिलांना शारदाई पुरस्कार देवून गौरविण्यात आले. पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्व विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी शिबीर व हेल्थ कार्ड वाटप आमदार भारतनाना भालके यांच्यावतीने करण्यात आले. तसेच पंढरपूर शहरात क्रीडा, शैक्षणिक, साहित्यीक या क्षेत्रात पंढरपूरचे नाव देशपातळीवर नेणाऱ्या खेळाडू, वक्ते यांना विशेष शारदाई सन्मान पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
तसेच देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना शेतकऱ्यांचा जाणता राजा संबोधित असताना शेतकऱ्यांचाही गौरव होणे तेवढेच गरजेचे असल्याने सोलापूर जिल्ह्यातील मदनसिंह पाटील, परमेश्वर राऊत, सुनिल माळी, सचिन शिनगारे व सिताराम रणदिवे या शेतकऱ्यांना आदर्श शरद कृषीनिष्ठ पुरस्काराने गौरविण्यात आले. डान्स स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कलारत्न जत, द्वितीय क्रमांक आरडीए डान्स ऍकॅडमी माही व माही डान्स ऍकॅडमी, तृतीय क्रमांक के.डी. व बिगबस्टर डान्स ऍकॅडमी यांना विभागून देण्यात आला.
यावेळी शारदाई पुरस्कार राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर, युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, युवतीच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, महिला प्रदेश सचिव सुवर्णाताई बागल, साधनाताई राऊत, सुभाषदादा भोसले, शहराध्यक्ष सुधीर भोसले, सोलापूर शहराध्यक्ष संतोषभाऊ पवार, युवकचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत बाबर, जिल्हाध्यक्ष विक्रांत माने, कुस्तीसम्राट अस्लम काझी, पंढरपूर नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे, कोळी महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अरूणभाऊ कोळी, धनंजयनाना कोताळकर, संजय बंदपट्टे, मोहम्मद उस्ताद, भिमा माळी, रशीद शेख, प्रशांत शिंदे यांच्यासह आदि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी युवक प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे, शहराध्यक्ष संदीप मांडवे, जिल्हा सचिव सुरज पेंडाल, आनंद कटले, संतोष बंडगर, विजय मोरे, दादा थिटे, सुरज कांबळे, सागर कावरे, शिंदे सर, विजय काळे आदिंनी परिश्रम घेतले.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा…
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट- *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165
_________________________________________________
_________________________________________________