Pandharpur Live :
अत्यंत गलिच्छ आणि खालच्या पातळीचं हे राजकारण आहे. आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्यातील सत्ता बदलानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी कुटुंबीयांसह वर्षा बंगला सोडला. नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अद्याप तिथं राहायला गेलेले नाहीत. मात्र ‘वर्षा’ बंगल्यातील भिंतीवर लिहिलेल्या वाक्यांवरुन आता राजकारणाला सुरुवात झाली आहे. या भिंतींवर लिहिलेल्या मजकुराचा व्हिडीओही समोर आला आहे. याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारवर टीका केली आहे.
अशी कुठलीही वाक्य बंगल्यातील भिंतींवर लिहिली नाही असे फडणवीस म्हणाले. जेव्हा बंगला सोडला तेव्हा भिंतीवर काहीच लिहिलेलं नव्हतं, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेल्या उद्धव ठाकरेंवर भाजपची आगपाखड सुरु झाली. विरोधी पक्षनेते पदी विराजमान झालेले देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करायला सुरुवात केली.
वर्षा बंगल्याच्या आतील भिंतींवर भाजप रॉक्स, देवेंद्र फडणवीस रॉक्स असे शब्द लिहिलेले दिसत आहेत. भिंतींवरील काही वाक्यांमध्ये यूटी वाईट आहेत (UT is mean), असा उल्लेख करण्यात आला आहे. यूटी म्हणजे नेमकं काय अशा चर्चांना त्यामुळे सुरुवात झाली आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कन्या दिविजा फडणवीस राहत असलेल्या खोलीच्या भिंतीवर Who is UT? UT Is mean? Shut Up अशी वाक्य लिहिण्यात आली आहे. Who is UT? युटी कोण आहेत, UT Is mean? युटी वाईट आहेत असे वर्षा बंगल्याच्या भितींवर लिहिलं आहे. BJP is rock, Bjp and shivsena were friend, Fadnavis rock असेही या भितींवर लिहिलं आहे.
याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी अमृता फडणवीस म्हणाल्या, वर्षा बंगला सोडून जवळपास महिना उलटला आहे. बंगला सोडताना सर्व नीट तपालसं होतं. सध्या सुरु असलेल्या चर्चा ऐकून आश्चर्य वाटलं, असे अमृता फडणवीस म्हणाल्या. तसेच पुढे बोलताना त्या म्हणाल्या, ‘वर्षा बंगला सोडल्यानंतर पुन्हा एकदाही तेथे आम्ही गेलेलो नाही. वर्षातील भिंतींवर काहीही लिखाण दिविजा किंवा कुणी केलेलं नाही, अशी माहिती अमृता फडणवीस यांनी दिली आहे.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा…
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट- *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165
_________________________________________________
_________________________________________________