👁 11 Views

कौतुकास्पद-उपरी गावातील आठवडा बाजाराची मागणी प्रशासनाकडून प्रलंबीत पण गावातील चिमुकल्यांनी भरवला बाजार!

Pandharpur Live : 
पंढरपूर,प्रतिनिधी
पंढरपूर-सातारा रस्त्यावरील उपरी(ता.पंढरपूर)येथे अनेक वर्षांपासून आठवडा बाजाराची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. परंतु अद्यापर्यत येथे बाजार भरला गेला नाही.परंतु ग्रामस्थांची इच्छा येथील जिल्हा परीषदेच्या शाळेतील बालकांनी पुर्ण केल्यामुळे ग्रामस्थांनी बालकांचे कौतुक करीत बाजार दिवसाला मोठ्या संख्येने हजेरी लावल्याचे दिसून आले.

विद्यार्थ्यांना शालेय ज्ञानासोबतच व्यवहारीक ज्ञान मिळावे,व्यवहार कौशल्य विकसित व्हावे,बाजार व दैनंदिन चलनांची माहीती मिळावी यासाठी उपरी येथील जिल्हा परीषदेत शाळेत शनिवारी सकाळी बाजार दिवसाचे आयोजन करण्यात आले होते.या बाजार दिवसाचे उद्दाटन सरपंच संगिता नागणे यांच्या हस्ते करण्यात आले.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा…
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________
याप्रसंगी ग्रा.पं.सदस्या अर्जना नागणे,आशा सोनवणे,शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष साहेबराव जगदाळे,शहाजी नागणे,पै.सतिश नागणे,अरुण गव्हाणे,महेश नागणे,विक्रांत जगदाळेाळे,मुख्याध्यापक ज्ञानेश्‍वर उगाडे आदी उपस्थित होते.याप्रसंगी विद्यार्थ्यांनी अनेक प्रकारच्या जिवनावश्यक वस्तु,मिठाई,वडापाव,ताज्या पालेभाज्या,मटकी,विविध द्य पर्दार्थ,अंकलिपी व विविध शालेय वस्तु विक्रीसाठी आणल्या होत्या.यातुन खरेदी विक्री,नफा तोटा,वजन मापे याचा प्रत्यक्षात अनुभव मुलांनी घेतला.या बाजारात इयत्ता दुसरी मधील विद्यार्थींनी झोया फिरोज मुलाणी हीने नागरीकत्व कायद्याच्या विरोधात देशात सुरु असलेल्या वादंगाच्या धर्तीवर शांतता संदेश देणारे व भारतियत्व व देशप्रेमाची जाणीव करुन देणारे साहीत्य विक्रीसाठी ठेवले होते त्यामुळे बाजारात झोया मुलाणीने विक्रीसाठी ठेवलेल्या वस्तु सर्वांचेच लक्ष वेधुन घेत होते.
ग्रामस्थांच्या मनातील बाजाराची अनेक वर्षांपासूनची इच्छा शालेय बालकांनी पुर्ण केल्यामुळे बाजारात ग्रामस्थांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती.त्यामुळे अवघ्या काही तासातच बाजारातील सर्व वस्तुंची खरेदी विक्री झाली.बाजार दिवस यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षीका वर्षा गोडसे,अनिता ढोपे,सविता बेलपत्रे,शिक्षक महादेव बागल व शाळाव्यवस्थापन कमिटीच्या पदाधिकार्‍यांनी  परीश्रम घेतले.या बाजारात 150 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा…
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *