👁 10 Views

पंढरपूर- शेतकऱ्यांच्या कांद्यावर चोरांचा डोळा…. लंपास केला 30 क्विंटल कांदा

Pandharpur Live : 
कांद्याचे दर वाढल्यामुळे शेतकरी वर्गात समाधान असले तरी शेतकऱ्यांच्या कांद्यावर चोरांचा डोळा असल्याने कांदा चोरून जाण्याच्या भीतीमुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.

नेमतवाडी (ता. पंढरपूर) येथील सुभाष गुळमे यांच्या शेतातील सुमारे 25 ते 30 क्विंटल कांदा चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. नेमतवाडी येथे सुभाष गुळमे यांची शेती आहे. गुळमे यांनी शेतामध्ये 2 एकरवर कांदा लागवड केली आहे. 

त्यामधील एक एकराच्या प्लॉटमधील काही कांदा काढून विक्री केला आहे. दुसरा एक एकराचा कांद्याचा प्लॉट काढणीस आला आहे. त्याची मंगळवारी काढणी करावयाची होती. परंतु, रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी शेतातील 25 ते 30 क्विंटल कांदा काढून चोरी केला आहे. सोमवारी सकाळी हा प्रकार निदर्शनास आल्याचे सुभाष गुळमे यांनी सांगितले. यामुळे गुळमे यांचे सव्वा लाखाचे नुकसान झाले आहे.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा…
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *