👁 12 Views

पंढरपूर तालुक्यात पुन्हा एक दुधभेसळ उघडकीस… तुमच्या मुलाबाळांच्या आरोग्याशी होतोय खेळ… बघा काय काय मिसळलं जातंय दुधात?

Pandharpur Live : 
पंढरपूर तालुक्‍यात दुधामध्ये भेसळ होण्याचे प्रकार सुरूच असुन आणखी एका डेअरीमध्ये दुध भेसळ होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तालुक्यातील सुगाव भोसे येथील श्रीराम दूध संकलन केंद्रावर अन्न प्रशासनाच्या पथकाने शुक्रवारी रात्री धाड टाकली. विना परवाना सुरू असलेल्या दूध संकलन केंद्रावर कृत्रिम दूध तयार केले जात होते.या दूध संकलन केंद्रातून तब्बल चार लाख रुपयांचे साहित्य व कृत्रिम दूध हस्तगत करण्यात आले आहे. दूध भेसळीचा धंदा आता गावापर्यंत पोहोचल्याने आरोग्याचा प्रश्‍न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.  लहान मुला-बाळांच्या आरोग्याशी खेळणा-या अशा भेसळ बहाद्दरांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकातून होत आहे.
श्रीराम दूध संकलन केंद्रावर पन्नास किलो मेलामाईन हा प्रतिबंधित पदार्थ आढळला. दुधात भेसळीसाठी हा पदार्थ वापरला जातो. श्रीराम दूध संकलन केंद्राचे मालक दत्तात्रेय महादेव जाधव ऊर्फ डॉक्‍टर (वय 40 रा. सुगाव भोसे, ता. पंढरपूर जि. सोलापूर) याच्याकडे अन्न प्रशासनाच्या पथकाने आणखी सखोल चौकशी केली. या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्याच्या पत्र्याच्या शेडवर शुक्रवारी रात्री धाड टाकली. जाधव यांचा नोकर व सहकारी गणेश हरी गवळी (वय 20) हा कृत्रिम दूध बनवत असताना या पथकाला आढळला. या शेडमध्ये दहा हजार दोनशे रुपये किमतीचे 51 किलो मेलामाईन, 19 हजार 140 रुपयांचे 638 लिटर भेसळयुक्त कृत्रिम दूध किंमत, 35 हजार 760 रुपये किमतीची 298 किलो दूध पावडर, एक लाख नऊ हजार नऊशे बारा रुपये किमतीची 1249 किलो व्हे परमीट पावडर, 98 हजार 880 रुपयांची 824 किलो लॅक्‍टोज पावडर, 14 हजार 900 रुपये किमतीचे 298 किलो पॅराफिन असा एकूण चार लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. नाशवंत व भेसळयुक्त दूध जागेवरच नष्ट करण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री आठ वाजता सुरू झालेली ही कारवाई पहाटे चार वाजता पूर्ण झाली.


अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर, सहकारी अधिकारी भारत भोसले, मंगेश लवटे, उमेश भुसे व योगेश देशमुख यांनी ही कारवाई केली. सर्व अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा कायद्याचे तंतोतंत पालन करूनच व्यवसाय करावा, अन्यथा अन्न व औषध प्रशासनाकडून कठोर कारवाईची पावले उचलण्यात येणार असल्याची माहिती पुणे विभागाचे सहआयुक्त सुरेश देशमुख यांनी दिली. मेलामाईन रसायनावर बंदी घालण्यात आली आहे. या रसायनांचे सेवन केल्यास माणसाच्या किडन्या आणि फुप्पुस निकामी होते. हे घातक मेलामाईन रसायन या ठिकाणी आढळले आहे. पॅराफिन हे खनिज द्रव्ये देखील या ठिकाणी आढळले असल्याची माहिती सोलापूरच्या अन्न प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त प्रदीप राऊत यांनी दिली.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा…
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *