👁 13 Views

अहिल्या पुल बनला धोकादायक- पुलावरून ट्रक चंद्रभागेत कोसळला… दोघेजण बुडल्याची भीती

Pandharpur Live : 
चंद्रभागेच्या नदीवरील अहिल्या पुलाचा कठडा तोडून आज एक चार चाकी वाहन नदीत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. काही महिन्यांपूर्वीच एक दुधाचा टँकर नदीत कोसळून घडलेल्या अपघातात दोघांना जलसमाधी मिळाली होती. आज पुन्हा एकदा याची पुनरावृत्ती झाल्याने पुलाची कमी असलेली रूंदी आणि मजबूत नसलेल्या कठड्यांमुळे हा पुल धोकादायक बनला असल्याचे दिसून येते.

आज रात्री साडे सहा वाजण्याच्या सुमारास टेंभुर्णीकडून पंढरपूर कडे येताना अहिल्या पुलावर एका मोटारसायकल ला ओव्हरटेक करताना सदर चार चाकी वाहन पुलावरून नदीत कोसळले. या वाहनात दोघेजण असल्याचे व सदर वाहन नदीच्या पात्रात मधोमध पडल्याचे समजते. नदीला भरपूर पाणी असल्याने व पाण्याच्या प्रवाहाचा वेग जास्त असल्याने ट्रक पाण्यात बुडून दुरपर्यंत वाहुन गेल्याचे समजते.

घटनास्थळी प्रांताधिकारी सचिन ढोले, तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आवचर पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे. 

काही महिन्यांपूर्वी याच ठिकाणाहून नदीपात्रात जलसमाधी घेतलेला दुधाचा टँकर अद्यापही नदीतच आहे. अजुनही नदीच्या बाहेर हा टँकर काढला गेला नाही. या टँकरमधील एकाच्या मृतदेहाचा शोध लागलेला आहे. 

वारंवार घडणारे येथील अपघात टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे.
 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *