👁 12 Views

हैदराबादमधून शेरवानी घालून येणारेच महाराष्ट्रात गडबड करतात खा.हुसैन दलवाई


सोलापूर  हैदराबादमधून शेरवानी घालून येणारेच महाराष्ट्रात गडबड करतात. मात्र, हे आम्हाला मान्य नाही, असं म्हणत काँग्रेस नेते आणि खासदार हुसैन दलवाई यांनी एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे.
महाराष्ट्रात राहणार मुसलमान हा खऱ्या अर्थाने मातीतला मुसलमान आहे. येथील मुसलमान हिंदू-मुस्लीम यांच्यात तेढ निर्माण होईल अशी भाषा कधीही करत नाही. मात्र, हैदराबादमधून शेरवानी घालून येणारेच येथे गडबड करतात, हे थांबलं पाहिजे, असं म्हणत दलवाई यांनी निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रातील मुस्लीमांना सत्तेत सामावून घेणे आवश्यक आहे. येथील मुसलमान मातीशी एकनिष्ठ आहे.
बाहेरुन येणारे काही लोक हिंदू-मुस्लीमांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, असंही ते म्हणाले आहेत.
दरम्यान, शिवसेनेचे हिंदुत्व आणि भाजपचे हिंदुत्व यांमध्ये खूप फरक आहे. शिवसेनेनं वेळोवेळी काँग्रेसला मदत केली आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांना पाठिंबा दिला होता, असं म्हणत दलवाई यांनी सेना-काँग्रेस संबंधाचे दाखले दिले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *