Pandharpur Live Online- – 8 ते 15 मार्चपर्यंत लागोपाठ आठ दिवस बँका बंद राहणार आहेत. यामध्ये 5 सरकारी सुट्ट्या आणि तीन दिवस संप आहे. म्हणजेच आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात बँकांनी व्यवसायिकांपासून सर्वसामान्य लोकांपर्यंत सर्वांना त्रास देण्याची तयारी केली आहे. आठ दिवस बँकिंग ठप्प झाल्यास सुमारे 2500 करोड रूपयांच्या व्यवहारांवर परिणाम होणार आहे.
बँकांच्या संपाच्या काळात सर्वरसुद्धा ठप्प करण्यात येतो, यामुळे ऑनलाइन बँकिंगचा पर्यायसुद्धा उपलब्ध राहात नाही. बँक अधिकारी सांगतात की, शहरात सरासरी 300 करोड रूपयांचे चेक, ड्राफ्ट आणि ऑनलाइन ट्रांजक्शनचे प्रति दिवस क्लियरिंग होते. बँका बंद राहिल्याने व्यवहार पुढे सरकत नाहीत.
9 मार्च- होळी
10 मार्च- होळी
11 मार्च- संप
12 मार्च- संप
13 मार्च- संप
14 मार्च- दूसरा शनिवार
15 मार्च- रविवार

