Pandharpur Live Online-
भारतात पूर्वीच्या काळात सोन्याचा धूर निघत होता असे म्हणत होते, त्याचबरोबर ‘सोने कि चिडिया’ हि असं भारताला म्हटलं जात होत. यालाही काही कारण होत, भारत हा पूर्वी आताच्या तुलनेत सुखी, समृद्धी आणि विकसित देश होता असं सांगण्यात येत. भारतातील अनेक ठिकाणी खोदकाम करताना याच वाक्याची प्रचिती देणाऱ्या गोष्टी सापल्याची काही उदाहरणेही आहेत.
तामिळनाडूमध्ये ही असच काही घडले आहे, तामिळनाडूतील थिरुवनाईकवल येथील जम्बुकेश्वर मंदिराच्या शेजारी खोदकाम करताना तांब्याच्या भांड्यात तब्बल १.७१६ किलोग्राम वजनाची सोन्याची नाणी सापडली आहेत. ५०५ सोन्याची नाणी मिळाल्याची खबर ही वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली.
ही नाणी तब्बल 1000 ते 1200 वर्ष जुनी आहेत. जमिनीच्या 7 फूट खाली एका तांब्याच्या भांड्यात ही नाणी सापडली आहेत. मंदिराच्या शेजारी मिळालेल्या या सोन्याच्या नाण्यांवर अरबी लिपीतील अक्षरं आहेत. अशी मंदिराच्या अधिकाऱ्यांनीही माहिती दिली आहे.
याबाबत मंदीर प्रशासनाकडून ही सोन्याची नाणी पोलिसांकडे सोपवण्यात आली आहेत. या सोन्याच्या नाण्यांच्या किमतीबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. मात्र देशभर या घटनेची चर्चा सुरु झाली आहे.


