👁 7 Views

Corona Virus- देशातील बाधीत रूग्णसंख्येत वाढ… आजपर्यंत 27 जणांनी गमावले प्राण


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या आता 1024 वर पोहोचली आहे तर आतापर्यंत देशभरात 27 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यातील 8 मृत्यू हे महाराष्ट्रातील आहे.


 महाराष्ट्रात रविवारी (29 मार्च) कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 22 ने वाढ झालीय, तर सोमवारी सकाळी त्यात वाढ झाल्याचे दिसून आले. 


सोमवारी सकाळी मिळालेल्या आकडेवारीत पुण्यामध्ये 5, मुंबईत 3. नागपूरमध्ये 2, कोल्हापूर आणि नाशिकमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा आकडा 979 झाली आहे. तर जगभरात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 6 लाखांपेक्षा जास्त झाली आहे.

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात कोरोनामुळे देशात सहा जणांना आपला प्राण गमवावे लागले आहे. तर 106 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. देशात एकूण 1100 हून जास्त जणांना कोरोनाची लागण झाली असून आज घडीला देशात 1136 कोरोनाग्रस्त आहेत. 


आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 215 वर पोहोचली आहे. रविवारी सकाळी 12 नवीन रुग्णाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे आहेत. पुण्यात 5, मुंबई 3, नागपूर 2, नाशिक आणि कोल्हापुरात प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. शनिवारपर्यंत 203 रुग्ण कोरोनाबाधित असल्याची माहिती समोर आली होती. मुंबईत आणखी 05 रुग्णांचा समावेश झाल्यामुळे आता मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या 114 वर पोहोचली आहे.


देशातील 27 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर 90 जण कोरोना होऊन देखील बरे झाले आहेत.


भारतात कोरोना व्हायरस पसरण्यास सुरुवात झाली आहे. देशात शनिवारीच कोरोनाग्रस्ताचा आकडा 1000 पार झालेला होता. केरळ आणि महाराष्ट्र या दोन राज्यात सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. आत्तापर्यंत देशात 27 राज्यात कोरोना व्हायरस पसरला आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *