Pandharpur Live-
श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने चैत्री यात्रा कामदा एकादशी निमीत्त आज 04-04-2020 रोजी श्री. विठ्ठल व रुक्मिणीमातेच्या गाभार्यात व मंदिरात गुलाबाच्या फुलाची सुंदर अशी आरास करण्यात आली आहे.
आज दि. ०४/०४/२०२० चैत्र शुद्ध कामदा एकादशी निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यास सुंदर अशा लाल रंगांच्या गुलाबांनी सजविण्यात आले.तसेच चैत्री वारी कामदा एकादशी निमीत्त श्री ची पुजा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य आमदार मा. श्री सौ सुजितसिंह ठाकुर व रुक्मिणीमातेची पुजा मा. श्री व सौ संभाजीराजे शिंदे ह्यांच्या हस्ते करण्यात आली… त्यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्री. विठ्ठल जोशी व व्यवस्थापक श्री. बालाजी पुदुलवाड उपस्थित होते.














