👁 12 Views

राजवीर राजलक्ष्मी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून पोलिसांना व पेट्रोल पंप, गॅस एजन्सीच्या कर्मचार्‍यांना चहा पानाचे वाटप



पंढरपूर (प्रतिनिधी):- कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर राज्यात संचारबंदी लागु आहे, या काळात अत्यावश्यक सुविधा पुरविणार्‍या पेट्रोल पंप येथे  बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस बांधवासाठी  व पेट्रोल पंप, गॅस एजन्सी येथील कर्मचार्‍यांसाठी राजवीर राजलक्ष्मी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने चहा-पानाची व्यवस्था करण्यात आली.


लिंक रोड येथील व्यंकटेश (एच.पी.) पेट्रोल पंप व आरुणा गॅस एजन्सी येथील सर्व कर्मचारी व पेट्रोल पंपावरील सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस बांधव यांना  राजवीर राजलक्ष्मी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, शिवसेनेचे माजी उपशहर प्रमुख  ओंकार  बसवंती, राजलक्ष्मी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या सचिव तथा शिवसेनेच्या महिला तालुका प्रमुख सौ.आरतीताई ओंकार बसवंती यांनी लिंबु शरबत, चहा आदी देवुन त्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

महाराष्ट्रातील कोरोना विषाणुचा फैलाव रोखण्यासाठी  महाराष्ट्र शासनाकडून अटीतटीचे प्रयत्न होत आहेत, नागरिकांना वारंवार घरातच थांबा, आवश्यक काम असल्याशिवाय बाहेर पडु नका असे आवाहन केले जात आहे; परंतु कांही नागरिक ही गोष्ट गांभीर्याने घेत नाहीत ही बाब चिंताजनक आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे व या काळात आपले कर्तव्य चोख बजावणार्‍या पोलीस बांधवांना आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर्स, कर्मचारी तसेच अत्यावश्यक सुविधा पुरविणार्‍या फर्ममधील कर्मचार्‍यांना आदराची वागणुक देत या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी. असे आवाहन यावेळी शिवसेनेच्या महिला तालुका प्रमुख सौ.आरतीताई ओंकार बसवंती यांनी केले. 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *