○ फेसबुक लाईव्ह शिक्षणामुळे पालक वर्गातुन महाविद्यालयाचे कौतुक
पंढरपूर: प्रतिनिधी
कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने संचार बंदी घालण्यात आली आहे. या संचार बंदी च्या कालावधीत ग्रामिण व शहरी भागातील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत. अशा लाॅकडाऊन कालावधीत कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयाने व्हटसप, गुगल क्लास रूम, फेसबुक लाईव्ह तसेच युटूब च्या माध्यमातून ज्ञानदान करण्याचे काम चालू केले आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी लाॅकडाऊन कालावधीत एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना फेसबुक लाईव्ह, गुगल क्लास रूम आणि व्हटसपच्या माध्यमातून शिकविण्याचे काम चांगल्या पद्धतीने सुरू असल्याने विद्यार्थ्यांना याचा खुप मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे.
सद्या सर्वञ संचार बंदी असल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांना ही घराबाहेर जाता येत नाही. अशा कालावधीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन यासाठी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून शिक्षण देण्याचे काम हाती घेतले आहे. महाविद्यालयातील प्रा. अनिल निकम व प्रा. शिवाजी पवार, प्रा. अतुल आराध्ये आदी प्राध्यापक दररोज विद्यार्थ्यांना सकाळी ९ ते ११ या कालावधीत व्हटसपच्या माध्यमातून फेसबुक लाईव्ह वर उपस्थित राहण्याचे आवाहन करून संबंधित प्राध्यापक फेसबुक लाईव्ह विषय शिकवत आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना घरी बसुन शिक्षण घेता येत असल्याने पालकांमधुन पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कौतुक होत आहे.
कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने जोरदार प्रयत्न केले जात असुन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी ही विद्यार्थ्यांना आपल्या घरी राहूनच शिक्षण देण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला असुन विद्यार्थ्यांना अभ्याविषयी काही अडचण असल्यास संबंधित शिक्षकांशी संपर्क साधावा आणि येणारी अडचण समजून घेण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी केले आहे.
ऑनलाईन शिक्षण घेते वेळी नेटवर्क समस्या निर्माण झाल्यास नंतर व्हटसप ग्रुपच्या माध्यमातून न समजेल्या चॅप्टर विषयी संबंधित शिक्षकांकडून माहिती विद्यार्थ्यांना घेता येते. फेसबुक लाईव्ह शिक्षण देत असताना विद्यार्थी आपला रोल नंबर व तुकडी कमेंट करतात यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षात येत आहे.
फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून पंढरपूर सिंहगड महाविद्यालयाने हाती घेतलेल्या या उपक्रमांचे पालक व विद्यार्थी वर्गातुन कौतुक होत असुन विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी मदत होणार आहे.
फोटो ओळी:- पंढरपूर सिंहगडचा ओंकार सुरवसे फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून आपल्या घरी राहून शिक्षण घेताना.


