👁 8 Views

रणरणत्या ऊन्हात कर्तव्यपुर्ती करणार्‍या पोलीस बांधवांचा त्याग बघुन तरी शिकुया… घरातच बसु या… कोरोनाला हरवुया!

Pandharpur Live तिसंगी (अशोक पवार) –पंढरपूर तालुक्यातील तिसंगी येथे आटपाडकर, मुलानी हे पोलीस बांधव दिवस आणि रात्र आपले कर्तव्य चोख बजावत आहेत. तिसंगी येथे कर्तव्यावर असलेले पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्तव्यपुर्ती करत असताना जेवणासाठी गाव सोडून न जाता गावातील याठिकाणी माळावरती असलेल्या पाण्याच्या टाकी खाली चटणी आणि भाकरी चा आस्वाद घेत असताना ते दिसत आहेत. 

हे चित्र पाहुन याची जाणीव मात्र झाली की, आपले कर्तव्य चोख बजावणारे पोलीस अपुर्‍या सुविधे अभावी सुध्दा कर्तव्यात कसुर करत नाहीत परंतु; आपण मात्र आपल्या कुटुंबाचा विचार सोडून देऊन, इतरत्र भटकत असतो. पोलीस बांधव आपला स्वतःचा संसार सोडून, इतरांचे जीवित रक्षणासाठी, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहोरात्र झटत आहेत.  कोरोना विषाणुला परतावुन लावण्यासाठी व देशाला लॉकडाऊन मधून बाहेर काढण्यासाठी ते धडपडत आहेत. रणरणत्या ऊन्हात पोलीसांची ही कर्तव्यनिष्ठा पाहुन तरी तुम्ही-आम्ही नियम पाळायला शिकुया, घरातच बसु या, कोरोनाला हरवुया… एवढेच.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *