Pandharpur Live Online- गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घरभाड्याबाबत एक प्रस्ताव राज्य सरकारसमोर ठेवला आहे. त्यानुसार घरमालकांनी भाडेकरुंना भाडे दिलं नाही म्हणून घराबाहेर काढू नये, तसंच किमान तीन महिने भाडेकरुंना वेळ द्यावा, असं या प्रस्तावात म्हटलं आहे.
घरमालकांनी भाड्यासाठी तगादा लावू नये, माणुसकी दाखवून थोडासा दिलासा द्यावा हा त्यामागचा हेतू आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हटलं आहे.
पुढचा काळ कठीण आहे, संकटाच्या काळात गरिबांच्या मागे उभं राहणं आवश्यक आहे. महिनाभर घरात आहे, राहायचं काय, खायचं काय, हा प्रश्न गोरगरिबांना आहे. त्यामुळे माणुसकीच्या नात्याने भाडेकरुंना दिलासा दिला, तर बरं होईल. तीन महिने भाडे पुढे ढकलावं, असं आवाहन जितेंद्र आव्हाडांनी केलं आहे.
घरमालकांनी भाडेकरुला घराबाहेर काढू नये. भाड्याचा ताण तातडीने देऊ नये. लोकांना घराबाहेर काढलं तर ते जाणार कुठे हा मोठा प्रश्न आहे, असंही आव्हाडांनी म्हटलं आहे.


