👁 16 Views

सोलापूरचे पालकमंत्री पुन्हा बदलले… आता नवीन पालकमंत्री पदी दत्तात्रय भरणेंची नियुक्ती

सोलापूर – सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले आहेत, याआधी असलेले जितेंद्र आव्हाड यांच्या जागेवर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हे पद देण्यात आले आहे, अचानक जिल्ह्याचा पालकमंत्री बदलण्याने जिल्ह्याचे राजकीय वातावरण तापले आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री का बदलले? या प्रश्नाला आणखी प्रश्न चिन्ह आहे. मात्र आव्हाडांच्या जागेवर राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंची नियुक्ती करण्यात आली आहे. मंत्रालयीन सचिव अनशु सिन्हा यांच्या मार्फत निवडीचे पत्र जारी करण्यात आले आहे.

करोनाची लागण झालेल्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात आल्याने जितेंद्र आव्हाड यांनी स्वत:ला होम क्वारंटाइन केलं आहे. याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी याची माहिती दिली होती. त्यामुळे त्यांच्याऐवजी ही जबाबदारी आता दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *