पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- सध्या देशात करोनानं थैमान घातलं आहे. देशात करोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सरकारकडून मोठी पावलं उचलण्यात येत आहेत. सध्या भारतात दररोज ५५ हजार करोनाच्या चाचण्या होत असून आतापर्यंत ५ लाखांपेक्षा अधिक लोकांच्या करोनाच्या चाचण्या करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.
आतापर्यंत ५ लाखांपेक्षा अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. जगाच्या तुलनेत आपला मृत्यूदर ३ टक्के आहे तर केस दुप्पट होण्याचा दरही ८.७८ टक्क्यांच्या जवळपास असल्याची माहितीही त्यांनी दिली.
काल (ता. २३) डॉ. हर्षवर्धन यांनी अन्य देशांच्या आरोग्यमंत्र्यांसह व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यावेळी ६ क्षेत्रातील ६ देशांनी माहितीचं सादरीकरण केलं. दक्षिण पूर्व आशिया मार्फत डॉ. हर्षवर्धन यांनी माहितीचं सादरीकरण केलं.
दरम्यान, सोशल डिस्टन्सिंगला आम्ही सोशल वॅक्सिन म्हणून वापर करण्यास सांगत असल्याचेही हर्षवर्धन यांनी सांगितले. तसेच देशात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून २१ हजार ७०० वर पोहोचली असल्याचंही त्यांनी सांगितले. तसेच सध्या भारतातच पीपीई किटचं उत्पादन करत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

