👁 13 Views

पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेजच्या वतीने मोफत ऑनलाईन एमएचटी-सीईटी सराव परिक्षेचे आयोजन

पंढरपूर: प्रतिनिधी – कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्वच शाळा, काॅलेज यांना सुट्या जाहीर केल्या आहेत. या सुट्टीच्या कालावधीत १२ वी परिक्षा दिलेल्या आणि अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊ इच्छुक विद्यार्थ्यांना कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयाच्या वतीने एम.एच.टी. सी.ई.टी.-२०२० या परिक्षेत विद्यार्थ्यांना उज्ज्वल यश संपादन करता यावे यासाठी घरी राहून एम.एच.टी. सी.ई.टी.-२०२० मध्ये होणा-या परिक्षेची ऑनलाईन पद्धतीने सराव करता येणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

     कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने सर्वञ संचार बंदी घालण्यात आली आहे. या संचार बंदी च्या कालावधीत विद्यार्थ्यांना आपल्या घरी राहून २०२० मध्ये होणा-या एम.एच.टी. सी.ई.टी.-२०२० या परिक्षेचा अभ्यास करता यावा, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. यासाठी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने   विद्यार्थ्यांना http://sknscoe.ac.in/cet.php या संकेतस्थळावर दिनांक २६ एप्रिल २०२० पासुन दर रविवारी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत यावेळेत ३ तासांची २०० गुणांची परिक्षा देता येणार आहे. ही परिक्षा विद्यार्थ्यांना घरी बसुन मोफत देता येईल.

     यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स या विषयातील प्रश्नांची रचना मुख्य एम.एच.टी.- सीईटी नुसार आणखी करण्यात आली असुन विद्यार्थ्यांना मुख्य एम.एच.टी.- सीईटी देण्यापूर्वी स्वयंमुल्यांकन करण्यासाठी   सराव परिक्षा अतिशय फायदेशीर ठरणार आहे.

    ज्या विद्यार्थ्यांना एम.एच.टी.- सीईटी-२०२० ची सराव परिक्षा द्यायची आहे. अशा विद्यार्थ्यांनी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या http://sknscoe.ac.in/cet.php या संकेतस्थळाला भेट द्या. अधिक माहितीसाठी प्रा. सोमनाथ कोळी ८३७८०१७५४६ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *