👁 11 Views

पुणे विभागात कोरोना बाधित 1200 रुग्ण -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

                      

         पुणे दि.25 :- विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1200 झाली असून विभागात 184  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 939 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण  77 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 42 रुग्ण  गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
            विभागात 1200  बाधित रुग्ण असून  77 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात  1094  बाधीत रुग्ण असून 71 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात  26 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात  42 बाधीत रुग्ण असून  3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 28  बाधीत रुग्ण असून  1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर  जिल्हयात 10 बाधीत रुग्ण आहेत.
            आजपर्यंत विभागामध्ये एकूण 13 हजार 693 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी  13  हजार 70 चा अहवाल प्राप्त आहे. 623 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 11 हजार  812 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 1  हजार 200 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
            आजपर्यंत विभागामधील 51 लाख 36 हजार 845 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्या अंतर्गत 1 कोटी 98 लाख 14 हजार 639 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 1067  व्यक्तींना  अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *