👁 12 Views

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी कंटेंटमेंट परिसरात टाळेबंदीचे निर्बंध कडक राबवा-उपमुख्यमंत्री अजित पवार

*कोरोना प्रतिबंधासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील
*पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील शॉपिंग मॉल काही काळ बंदच
*कोणत्याही परिस्थितीत कोरोनाची साखळी तोडा
नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे
            पुणेदि. 25 : पुणे आणि पिंपरी-चिंचवड मध्ये कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी टाळेबंदीचे निर्बंध कडकपणे राबवावेतअसे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुणे येथे दिले.
           पुण्यातील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आलीयावेळी त्यांनी हे निर्देश दिले. बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळविभागीय आयुक्त  डॉ. दीपक म्हैसेकरपोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशमसंदीप विष्णोईजिल्हाधिकारी नवल किशोर रामपुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाडपिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकरअतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवालपोलीस अधीक्षक संदीप पाटीलजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसादआरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखेसार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
              उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संबंधित विभागांकडून  केल्या जाणाऱ्या विविध उपाययोजनांबाबत माहिती जाणून घेतली. तसेच योग्य ते उपाय सुचवून त्यांची गतीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
      पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या व मृत्यू दर कमी करणे आवश्यक आहे. या भागात गर्दी होऊ नये ,यासाठी येथील शॉपिंग मॉल कोणत्याही परिस्थितीत सुरु करण्यात येऊ नयेतअसे निर्देश त्यांनी दिले.
 उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले,  कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक ती मदत तात्काळ उपलब्ध करुन देण्यात येईल. कंटेंटमेंट भागात लॉक डाऊनचे धोरण पोलीस प्रशासनाने कडक अवलंबून  कोणत्याही परिस्थितीत कोरोनाची साखळी तोडणे आवश्यक आहे. यापूर्वी क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींना वेळेत व चांगल्या दर्जाचे भोजन पुरवावे. शहरातील रुग्णसंख्या वाढू नयेयासाठी झोपडपट्टी भागातील कुटुंबियांचे संस्थात्मक क्वारंटाईन करुन त्यांना अन्नधान्य व अत्यावश्यक साहित्याचा पुरवठा करण्याबाबत नियोजन करावे. प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेले निर्बंध पाळून नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावेअसे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले.
              कोरोना प्रतिबंधासाठीच्या उपाययोजना राबविण्यासाठी आरोग्यसेवा  तत्पर आणि सक्षम होण्यासाठी ससून रुग्णालयाच्या नवीन अकरा मजली इमारतीची उर्वरित कामे गतीने पूर्ण करावीतअसे सांगून रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यास त्यांच्यावर वेळेत उपचार होण्याच्या दृष्टीने काटेकोर नियोजन करावे. गरज भासल्यास शिवछत्रपती क्रीडा संकुलाची इमारत व शैक्षणिक संस्थांच्या इमारतीमध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देता येईल.
अन्य जिल्ह्यातील मजुरांच्या स्थलांतराबाबत संबंधित जिल्हाधिका-यांनी एकमेकांशी समन्वय साधून निर्णय घ्यावाअसे त्यांनी सांगितले. कोरोना प्रतिबंधात विविध विभाग चांगले काम करत असल्याबद्दल कौतुक करुन या कामी कार्यरत शासनाच्या कोणत्याही विभागातील कर्मचाऱ्याचा कोरोना प्रदूर्भावामुळे मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांची मदत देण्याबाबत मुख्यमंत्री महोदयांसोबत चर्चा झाली आहेअसे सांगून याबाबत योग्य तो निर्णय होईलअसे ते म्हणाले.
            पोलीसांच्या आरोग्याची तपासणीएन-95 मास्कवैद्यकीय किट व आवश्यक ती साधने उपलब्ध करुन देण्यात यावीतअसे त्यांनी सांगितले.
            विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी विभागातील कोरोना परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. रुग्णदर व मृत्यूदर कमी करण्यासाठी संबंधित वैद्यकीय अधिकारी व डॉक्टरांसोबत बैठका घेऊन नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ससून रुग्णालयाला आवश्यक बाबींची पूर्तता करण्यात येत असल्याची माहिती दिली.
कंटेंटमेंट भागात महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणारी स्वच्छेतेची खबरदारी व अत्यावश्यक साधनसामुग्री पुरवण्यासाठी करण्यात येत असलेल्या नियोजनाबाबत महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी माहिती दिली.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कोरोना चा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. कोरोना उपचारात सक्रिय खासगी रुग्णालयांना प्रशासन व स्वयंसेवी संस्थांच्या वतीने आवश्यक ती वैद्यकीय साधनसामग्री पुरवण्यासाठी नियोजन करण्यात येत आहेअसे सांगितले. तसेच कोरोना संसर्गाने आतापर्यंत जिल्ह्यात मृत्यू झालेल्या रुग्णांची वैद्यकीय पार्श्वभूमी व त्याअनुषंगाने माहिती दिली.
            पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशमसंदीप बिष्णोयी व पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.
तसेच अन्य अधिकाऱ्यांनी देखील सविस्तर माहिती दिली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *