👁 13 Views

शेतीच्या वादातून चौघांचा हल्ला… महिलेसह दोघे गंभीर जखमी

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) शेतीच्या वादातून चौघांनी मिळुन महिला व मुलावर कुर्‍हाडीने हल्ला केला. यात दोघेजण जखमी झाले आहेत. ही घटना अंबलटेक येथे घडली असुन याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
     याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विजयकुमार गोविंद नागरगोजे, रा. अंबलटेक, ता. अंबाजोगाई हे आज दि. 14 मे रोजी सकाळी 10 वाजण्याचे सुमारास त्यांच्या आईसह शेतावर गेले असता तेथील विठ्ठल वाल्मीक नागरगोजे, वाल्मीक राजाराम नागरगोजे, व्यंकटी वाल्मीक नागरगोजे, बालाजी माणिक नागरगोजे यांनी आम्हाला विकलेली जमीन आत्ताच मोजुन दे असे म्हणत चौघांनी मिळुन विजयकुमार नागरगोजे व त्यांच्या आईवर काठी, कुर्‍हाडीने हल्ला केला. यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!

Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-

DVP MART


      याप्रकरणी विजयकुमार नागरगोजे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *