Pandharpur Live –
गडहिंग्लज (प्रतिनिधी)
मैत्रांगण बहुऊद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गडहिंग्लज च्या प्रांताधिकारी विजया पांगारकर यांना गौरवपत्र देऊन सन्मानित केले.
प्रांताधिकारी यांनी कोरोना महामारीच्या या काळात अतिशय चांगले काम केले आहे, लॉक डाऊनच्या काळात जनतेच्या सुरक्षेसाठी त्यांनी रस्त्यावर ऊतरून काम केलेले आहे. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्या योग्य नियोजन करत आहेत. त्यामुळे एक दक्ष अधिकारी म्हणुन त्यांना गौरव पत्र देऊन त्यांचा सन्मान करन्यात आला आहे.
या वेळी संस्थेच्या अध्यक्षा अनिता पाटील वृषाली जोशी, जिजाऊ ब्रिगेडच्या तालुका ध्यक्षा सुमन सावंत, छाया ईंगळे आदी उपस्थित होत्या.
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!

