👁 7 Views

‘या’ तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा धावणार ‘लालपरी’

Pandharpur Live Online – ll

कोरोना लॉकडाउन दरम्यान गेल्या 2 महिन्यांपासून बंद असलेली ‘लालपरी’ म्हणजेच एसटी बस येत्या 15 जूनपासून तालुकांतर्गत प्रवाशांच्या सेवेसाठी पुन्हा धावणार आहे. 

ग्रामीण भागात तालुक्याच्या गावात बँक आणि इतर सरकारी सुविधा उपलब्ध असतात. त्यामुळे तालुक्यात गेल्याशिवाय ग्रामस्थांचे अर्थचक्र सुरूच होऊ शकत नाही हे ओळखून परिवहन मंत्री व महामंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल परब यांनी एसटीच्या खेडेगाव ते तालुका प्रवासास मंजूरी दिली आहे.

पुणे विभागातील सर्व आगार प्रमुखांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!

एसटी महामंडळाने लॉकडाऊनच्या शेवटच्या टप्प्यात तालुका ते तालुका आणि तालुका ते जिल्हा मुख्यालय अशा सुरू केलेल्या फेर्‍यांना ‘सोशल डिस्टन्सिंग’च्या नियमाच फटका बसला होता. त्याकरीता अपेक्षित उत्पन्नापेक्षा खर्चच जादा झाला होता. त्यामुळे प्रवाशांची मागणी, गाड्यांची उपलब्धता आणि उत्पन्नाची हमी असेल तेथे प्राधान्याने ‘गाव ते तालुका’ अशी सेवा सुरू करा असे आदेश एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक व्यवस्थापक (वाहतूक ) राहुल तोरो यांनी दिले आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यासह काही महत्वाच्या जिल्ह्यात येत्या काही दिवसांत तालुक्यांतर्गत एसटी सेवा सुरू होणार आहे.

22 मार्चपासून कोरोना साथीने लॉकडाऊन सुरू झाल्याने अन्य वाहतूक साधनांप्रमाणेच एसटी सेवा बंद करण्यात आली होती. 22 मेपासून ‘रेड व कटोंनमेंट झोन’ वगळता एसटी महामंडळाच्या तालुका ते तालुका व जिल्हा मुख्यालय ते तालुका अशा मार्गांवर बससेवा सुरू केली होती. राज्य सरकारने राज्यात अडकलेल्या मजूरांसाठी मोफत सेवा देऊन पाच लाख मजूरांना त्यांच्या राज्यांच्या सीमेपर्यंत सुखरूपपणे पाठविले होते. तसेच मंबईतही बेस्टच्या खांद्यास खांदा लावून एसटी महामंडळाने मुंबई, ठाणे आणि पालघर विभागात अत्यावश्यक सेवा घटकांसाठी आपल्या अडीचशे बसेस दिल्या आहेत.

कोरोना लाॅकडाउनमुळे ठप्प झालेली एसटीची प्रवासी वाहतूक पुर्वपदावर आणण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागीय नियंत्रक यामिनी जोशी यांनी चार टप्प्यांत नियोजन केले आहे.

● पहिला टप्पा : पहिल्या टप्प्यात पंधरा जुनपासून तालुक्यातील प्रमुख मार्ग, मोठ्या लोकवस्तीची गावे तसेच टोकाची गाव ते तालुका,आगार अशा किमान तीन फेऱ्या सुरु केल्या जातील.

● दुसरा टप्पा : दुस-या टप्प्यात तालुका व तालुक्याचे प्रमुख गाव ते जिल्हा मुख्यालय किमान तासांचे वारंवारता किंवा गरजेप्रमाणे फे-या सुरु होतील.

जिल्हा ते जिल्हा अद्याप वाहतूकीस मनाईच
राज्यात लॉकडाऊन हटविण्यात आल्याने जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी एसटीच्या खेडेगाव ते तालुका अशा फेर्‍या सुरू करण्यास एसटी महामंडळाच्या काल झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्यांतर्गत एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात जाण्यासाठी कोरोना प्रादुर्भावामुळे अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. नागरीकांना दिलासा देण्यासाठी एसटी महामंडळाने ‘रेड व कन्टोनमेंट झोन’ वगळता खेडेगाव ते तालुका अशी बससेवा सुरू करण्यास तूर्तास मंजूरी दिली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *