👁 10 Views

यहॉं मौसम की तरहा किस्मत बदल जाती है… एका रात्रीत स्टार बनलेल्या राणू मंडल यांच्यावर उपासमारीची वेळ


Pandharpur Live Online –

मुंबई- मुंबई या महानगरीनं कित्येकांना जमिनीवरून उचलून गगनचुंबी स्वप्नं दाखवली, ती सत्यातही आणली; परंतु यश मिळाल्यानंतर  इथं माणुस कुठं थोडा जरी चुकला तर मात्र होत्याचं नव्हतं होऊन बसतं. क्यूं के “यहॉं मौसम की तरहा किस्मत बदल जाती है”  एका रात्रीत स्टार बनलेल्या राणू मंडल यांच्यावर उपासमारीची वेळ रेल्वे स्थानकावर गाण गाणाऱ्या राणू मंडल यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, आणि त्यांच्या आयुष्यात नवी पहाट आली. देशभर त्यांचे कौतुक केले जाऊ लागले. सिनेमासह अनेक टीव्ही चॅनल्सवर गाण्याच्या माध्यमातून राणू मंडल यांचा आवाज सगळीकडे पोहोचला.

सोशल मीडियाच्या तर त्या नायिका झाल्या. मात्र काही महिने लोटल्यानंतर आता परिस्थिती पुन्हा पालटली असून राणू मंडल यांच्या नशीबात पुन्हा जुने दिवस आले आहेत.

लॉकडाऊनच्या काळात दोन वेळेचे जेवण मिळणेही राणू मंडल यांच्यासाठी कठीण झाले आहे. त्यांना कधीतरी एक वेळचे जेवण मिळते, त्यातही फक्त भात मिळत असल्याचे समोर आले आहे.

आसपासच्या लोकांनी काही दिले तरच त्यांना अन्न मिळत आहे.

Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!

अन्यथा उपाशीपोटी झोपण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

रेल्वे स्टेशनवर गाण गाणाऱ्या राणू यांच्या एका व्हिडिओमुळे त्यांचे आयुष्य़ बदलले खरे, परंतु आता त्याच राणू मंडल यांच्यावर ही वेळ ओढावल्याची परिस्थिती आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर हिमेश रेशमियाने बॉलिवूडमध्ये राणू मंडल यांना संधी दिली. आणि राणू मंडल यांनी गायलेली इतर गाणीही लोकप्रिय झाली. मात्र ही लोकप्रियता आणि यश हे राणू यांच्यासाठी क्षणिकच ठरले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *